अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील देवगड यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. या यात्रेनिमीत्त संगमनेर अश्व प्रेमी असोसिएशनच्या वतीने अश्व प्रदर्शन, अश्व स्पर्धा आणि अश्व बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ फेब्रुवारीला देवगड हिवरगांव पावसा येथे होणार आहे. याची माहिती अश्वप्रेमी असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख यांनी दिली.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
संगमनेर तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड (हिवरगाव पावसा) हे भाविकांचे श्रद्धा स्थान आहे. खंडोबाचे वाहन घोडा असल्यामुळे या अश्व (घोडा) प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. मागील ४ वर्षांपासून या प्रदर्शनाचे आयोजन होत असून राज्यातील हे मोठे अश्व प्रदर्शन असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यावर्षी स्पर्धेचे हे पाचवे वर्षे असून या वर्षीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होणार आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
जगभर अश्वांच्या विविध प्रजाती आणि त्यांचे गुणधर्म प्रसिद्ध आहे. अगदी शिवकालापासून घोड्यांना विशेष महत्व आहे. दरवर्षी अश्व प्रदर्शनासाठी विविध अश्वपालक अनेक देशी - विदेशी जातिवंत घोड्यांसह सहभागी होतात. यावर्षीही अनेक अश्वपालक अनेक देशी विदेशी जातिवंत घोड्यासह सहभागी होत असून या प्रदर्शनाचे स्वरूप आणखी विस्तृत करण्यात आले आहे. अश्व प्रदर्शनाबरोबरच गायीच्या प्रदर्शनाचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
![undefined](https://s3.amazonaws.com/saranyu-test/etv-bharath-assests/images/ad.png)
अशी आसणार बक्षिस -
या प्रदर्शनात सर्वोत्कृष्ट नाचणाऱ्या घोड्यास प्रथम ३१ हजार रुपये, द्वितीय २१ हजार रुपये, तृतीय ११ हजार रुपये आणि चतुर्थ ७ हजार रुपये, अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट घोडा व घोडीसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार रुपये, पारितोषिके दिली जाणार आहेत. उत्कृष्ट चाल स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार, तर उत्कृष्ठ लहान घोड्यास प्रथम ११ हजार, द्वितीय ७ हजार, तृतीय ५ हजार रुपये अशी पारितोषिके दिली जाणार आहे.