ETV Bharat / state

Dilip Walse Patil न्यायालय म्हणत असेल तर आर्यन खान निर्दोष, तपासात एनसीबीचे सत्यही पुढे येईल - गृहमंत्री पाटील - Dilip Walse Patil talk aryan khan

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil talk on aryan khan) यांनी आर्यन खानवर प्रतिक्रिया दिली. न्यायालयाचा निकाल मी वाचलेला नाही, मात्र जे अहवाल आले आहेत त्याच्यामधून जर न्यायालयाने आर्यन खानची (aryan khan) निर्दोष सुटका केली असेल किंवा तशा प्रकारचे विचार व्यक्त केले असतील तर, हे सिद्ध होते की तो निर्दोष आहे, असे दिलीप वळसे पाटील म्हणाले.

Dilip Walse Patil talk on aryan khan court case
आर्यन खान सुनावणी दिलीप वळसे प्रतिक्रिया
author img

By

Published : Nov 21, 2021, 4:30 PM IST

Updated : Nov 21, 2021, 4:53 PM IST

अहमदनगर - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil talk on aryan khan) यांनी आर्यन खानवर प्रतिक्रिया दिली. न्यायालयाचा निकाल मी वाचलेला नाही, मात्र जे अहवाल आले आहेत त्याच्यामधून जर न्यायालयाने आर्यन खानची (aryan khan) निर्दोष सुटका केली असेल किंवा तशा प्रकारचे विचार व्यक्त केले असतील तर, हे सिद्ध होते की तो निर्दोष आहे. त्याचबरोबर, या प्रकरणात जर एनसीबीने षडयंत्र केले असले तर, त्याबाबतची माहिती तपासातून पुढे येईल, असे मत दिलीप वळसे - पाटील यांनी व्यक्त केले.

प्रतिक्रिया देताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

हेही वाचा - अभिनेत्री कंगनाची स्वातंत्र चळवळीवर बोलण्याची लायकी आहे का? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात....

क्रूझ ड्रग पार्टी (Cruise Drug Case) प्रकरणात आर्यन खानकडे (Aryan Khan) ड्रग्ज सापडले नाहीत. त्याच्या वॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये कट कारस्थान करण्याचा हेतू असल्याचे आढळून आले नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) म्हटले आहे. यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारले असता त्यांनी सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचबरोबर, केंद्र सरकार राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चुकीचा वापर करत असल्याचे मतही गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांनी व्यक्त केले.

संत निळोबाराय अभंग गाथा प्रकाशन

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथे संत निळोबाराय यांच्या अभंग गाथा प्रकाशन सोहळ्यासाठी दिलीप वळसे - पाटील आलेले होते. या कार्यक्रमास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अशोक सावंत, आमदार निलेश लंके आदी उपस्थित होते. यावेळी संत निळोबाराय यांच्या अभंग गाथेच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्याचबरोबर, संत निळोबाराय मंदिर आणि वाडा त्याचा जिर्णोद्धार भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

हेही वाचा - हमीभावाचा कायदा करून दिलासा द्या, नगरच्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांची मागणी

Last Updated : Nov 21, 2021, 4:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.