ETV Bharat / state

अहमदनगर : योग्य नियोजन आणि ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्तीने हिवरे बाजार कोरोनामुक्त - हिवरे बाजार नगर जिल्हा

आदर्श गाव असलेले हिवरे बाजार आता कोरोनामुक्त झाले आहे. येथे आता एकही कोरोना रूग्ण नाही. गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला. ग्रामपंचायत प्रशासनाला सहकार्य केले. यामुळे गाव कोरोनामुक्त झाले, असे आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले.

Hiware Bazar
हिवरे बाजारा
author img

By

Published : May 15, 2021, 11:48 PM IST

अहमदनगर - राज्यातच नव्हे, तर देशात आदर्श ग्राम म्हणून ओळख असलेले हिवरे बाजार गावाला गेल्या दीड महिन्यापासून कोरोनाने ग्रासले होते. मात्र, आदर्श ग्राम समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांचे शास्त्रशुद्ध नियोजन आणि त्याला गावकऱ्यांनी केलेली प्रामाणिक अंमलबजावणीची साथ यामुळे आता हिवरे बाजार कोरोनामुक्त झाले आहे.

योग्य नियोजन आणि ग्रामस्थांच्या स्वयंस्फुर्ती अंमलबजावणीमुळे हिवरे बाजार कोरोनामुक्त

हिवरे बाजारमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या शेवटी आढळला. यावेळी ग्रामसुरक्षा समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नियोजन केले. आरोग्य यंत्रणा, ग्राम सुरक्षा समिती आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामार्फत नियोजन केले. आरोग्य यंत्रणा ग्रामसुरक्षा समिती यांची 4 पथके तयार केली. गावातील प्रत्येक व्यक्तीची तपासणी आरोग्य यंत्रणेने केली. तर ग्रामसुरक्षा कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना कडक नियम पाळण्यासाठी आवाहन करत बाधितांचे विलगीकरण केले. ग्रामस्थांनी आवाहन केलेले नियम प्रमाणिकपणे पाळले. यामुळे गाव शंभर टक्के कोरोनामुक्त झाले, असे पोपटराव पवार यांनी सांगितले.

पोपटराव पवारांचे सरपंचांना आवाहन

पवार यांनी नगर जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील ग्रामपंचायतीशी व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे हिवरे बाजारने राबवलेल्या कोरोनामुक्तीची सूत्रे सांगितली. 'नागरिकांचा प्रमाणिक सहभाग नसेल तर यंत्रणा हतबल ठरतात. साथरोग आटोक्यात येत नाही. त्यामुळे गावागावातील स्थानिक राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येत उपाययोजना आखणे आणि त्याचे नागरिकांकडून पालन करून घेणे गरजेचे आहे. त्यात नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्यास कोणतागी साथरोग आटोक्यात आणता येतो. हा साधा फॉर्म्युला आहे. तो प्रमाणिकपणे पाळावा, असे आवाहन पोपटराव पवार यांनी ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि ग्रामस्थांना व्हिडिओ कॉन्फरंसिंगद्वारे केले.

हेही वाचा -'माझ्या मानसिक संतुलनाची काळजी अशोक चव्हाणांनी करू नये'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.