शिर्डी ( अहमदनगर ) - महाराष्ट्रात आता हिंदुत्ववादी सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कडवट हिंदुत्ववादी आहेत. तर हिंदूह्रद्यसम्राट देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावे असा इशारा भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिला Nitesh Rane protest in Srirampur आहे. नितेश राणे यांनी फडणवीस यांचा उल्लेख हिंदूह्रद्यसम्राट असा केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. यावर देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्यात चुकीचे काय ? जो जो हिंदूचे रक्षण करतो. हिंदूच्या हृदयात आहे त्यांना हिंदुहृदयसम्राट नाही म्हणायचं तर काय म्हणायचं असा प्रतिप्रश्न राणे यांनी उपस्थित केला Devendra Fadnavis hinduhridaysamrat आहे.
धर्मांतरण, अपहरणाच्या घटनांत वाढ - लव्ह जिहाद प्रकरणी श्रीरामपूरमध्ये गेल्या काही काळात मुली बेपत्ता होण्याचे प्रकार वाढले आहेत. त्याविरोधात आंदोलनात आता भाजपा आणि नितेश राणे हेही उतरलेले दिसत आहेत. धर्मांतरण आणि आदिवासी तरुणांच्या अपहरणाच्या घटनाही वाढल्या आहेत. या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी सर्व हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले jan akrosh morcha protest आहे. अपहरण प्रकरणात पोलीस अधिकारी माहिती द्यायला तयार नाही. नवाब मलिक आता मंत्री नाहीत. हसन मुश्रीफ नगर जिल्हयाचे पालकमंत्री नाहीत आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री Nitesh Rane criticizes shiv sena नाहीत. हे पोलीस प्रशासनाने ध्यानात ठेवावे. राज्यात हिंदुत्ववादी सरकार सत्तेत आहेत. हिंदूकडे कोणी वाकड्या नजरेने पाहीले तर तो निट घरी जाणार नाही. हे लक्षात ठेवा आम्ही शांततेत आहोत तर शांततेत राहू द्या. आम्हाला थर्ड डिग्री, फोर डिग्री द्या. शस्त्र हातात घ्यायला लावू नका असा इशाराआ. नितेश राणे यांनी श्रीरामपूर येथील हिंदू जणआक्रोश मोर्चाप्रसंगी आज शनिवारी दिला आहे.
उद्धव ठाकरेंचे सरकार हिंदूद्वेषी - उद्धव ठाकरे यांचे सरकार हिंदूद्वेषी राज्यात उद्धव ठाकरे यांचे सरकार हे हिंदूद्वेषी होते. याच मविआ सरकारच्या काळात हिंदूंना दाबण्यात आले. धर्मांतरणाचे प्रकार वाढल्याची टीकाही राणे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात हिंदू धर्मांवर निर्बंध टाकण्यात आले. त्यांनी आता हिंदुत्वाची भाषा करु नये अशी टीका राणे यांनी केली आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक बांधण्याऐवजी याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आले.अशी टीका त्यांनी केली आहे. त्यांना बाळासाहेबांच्या नावाने मते मागू नका हे सांगण्याचा अधिकार आहे का असा सवालही नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांपेक्षा याकूब मेमन मोठा झाला आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आम्ही शांत बसणार नाही. तातडीने दिपक बडेचा तपास लागला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने काय करायचे ते करू असा इशारा राणे यांनी यावेळी दिला. यापुढे हिंदू माता भगिनींकडे कोणी वाकड्या नजरेने पाहीले तर त्यांना धडा शिकवू आणि समोरच्यांना हिंदू आता एकटा नाही हा संदेश देवू असा इशाराही यावेळी राणे यांनी दिला.
पोलीस यंत्रणेविरोधात मोर्चा - श्रीरामपुरात आज शनिवारी दुपारी आमदार नितेश राणे आणि माजी आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरातील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर हिंदु जनआक्रोष मोर्चा काढण्यात आला. श्रीरामपुर तालुक्यातील भोकर येथील आदिवासी भिल्ल समाजाचा तरूण दिपक बड़े याचे अपहरण केले आणि त्याचा खून आरोपींनी केला असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मात्र पोलिसांना अद्यापपर्यंत दिपक बड़े हा सापडलेला नाही. पोलिस तपास यंत्रणेच्या विरोधात आज हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चा शिवाजीरोड मेनरोड मार्गे अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयावर गेला. या मोर्चामध्ये शहरातील विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आदिवासी भिल्ल समाज संघटनेचे कार्यकर्ते तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.