ETV Bharat / state

उच्च न्यायालयाची परवानगी न घेता सुमारे 25 कोटी रुपयांची बिले परस्पर भरल्याने बगाटे यांच्या अडचणीत वाढ - etv bharat maharashtra

शिर्डी साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कान्हुराज बगाटे यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची परवानगी न घेता सुमारे 25 कोटी रुपयांची बिले परस्पर अदा केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी झाली असून बगाटे यांना नोटीस काढली असल्याचे सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगितले.

c
c
author img

By

Published : Oct 13, 2021, 8:45 AM IST

अमहदनगर - शिर्डी साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कान्हुराज बगाटे यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची परवानगी न घेता सुमारे 25 कोटी रुपयांची बिले परस्पर अदा केल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी झाली असून बगाटे यांना नोटीस काढली असल्याचे सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी सांगितले.

माहिती देताना संजय काळे

कोपरगाव येथील सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी 2019 मध्ये उच्च न्यायालयात एका याचिकेत संस्थानच्या विश्वस्त व्यवस्थेला केवळ दैनंदिन खर्च करण्याची परवानगी दिली होती. जनहित याचिका 120/2019 मध्ये न्यायालयाने चार सदस्यांच्या तदर्थ समितीचे गठण केले. यामध्ये प्रधान जिल्हा न्यायाधीश यांना समितीचे अध्यक्ष करण्यात आले. ऑगस्ट, 2020 मध्ये संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कान्हूराज बगाटे यांची नियुक्ती झाली.

शिर्डी साईबाबा संस्थानचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी तदर्थ समिती व उच्च न्यायालयाची परवानगी न घेता जवळजवळ 25 कोटी रुपयांची बीले परस्पर न्याती कन्स्ट्रक्शन व भानू कन्स्ट्रक्शन व इतरांना अदा केल्याबाबतची माहिती संजय काळे यांना माहितीच्या अधिकारात मिळाली. याबाबत काळे यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात उच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेत सुनावनी झाली. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.व्ही. गंगापूरवाला व न्यायमूर्ती आर.एन. लढ्ढा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बगाटे यांना या अवमान याचिकेत नोटीस काढली असल्याचे म्हटले आहे. पुढील सुनावणी आठ आठवड्यांनी होणार असून या याचिकेत याचिकाकर्ते यांचे वतीने अ‍ॅड. प्रज्ञा तळेकर व अ‍ॅड. आजिंक्य काळे यांनी काम पाहिले.

हेही वाचा - राज्यातील विविध नेत्यांवर होत असलेल्या भष्ट्राचाराच्या कारवाईनंतर विखे पाटलांचे सूचक विधान, म्हणाले...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.