अहमदनगर - जिल्ह्यात बुधवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाची संरक्षक भिंत कोसळली. काकडी तळेगावकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजुने एटीसी टॉवरनजीक एका ठिकाणी ही भिंत कोसळली. तर या पावसामुळे विमान उड्डाणासाठी आवश्यक आसणारी दृष्यमानता (Visibility) अंधार पडल्याने मिळत नसल्याने उड्डाणे रद्द करण्यात आले होते, या माहितीस विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी दुजोरा दिला आहे.
हेही वाचा - अमेरिकेमध्ये आहेत भारतातील 'ही' शहरे, भारतीय दूतावासाने दिली माहिती
यामध्ये स्पाईसजेटचे भोपाळ, हैदराबाद तर एअर इंडियाचे हैदराबाद जाणारे विमान रद्द करण्यात आले होते. तर दिल्लीला जाणाऱ्या विमानात प्रवासी बसून होते. या विमानाचे उशिरा उड्डाण झाले. तसेच आजपासून सुरु होणाऱ्या चेन्नईच्या विमानाचे उड्डाणही रद्द करण्यात आले आणि शिर्डीकडे येणारी विमाने इतरत्र ठिकाणी वळविण्यात आले.
हेही वाचा - चंद्रपूर जिल्ह्यातील 'या' तीन मतदारसंघातून वंचितचे उमेदवार जाहीर
विमानतळाची सरक्षक भिंत पडण्याची ही दुसरी घटना आहे. सरक्षक भिंतींचे काम चालु असताना स्थानिकांनी हे काम निकृष्ठ होत असल्याची तक्रार केली होती. मात्र, या तक्रारींकडे दुर्लक्ष करत असल्याने संरक्षक भिंत पडत असल्याने, प्रशासनाचे या कामांबाबत दुर्लक्ष होत असल्याचे समोर दिसत आहे.