ETV Bharat / state

कोरोनावर देशी दारुचा काढा, ५० रुग्णांना बरे केल्याचा दावा, आता डॉक्टरांनी केले घुमजाव - अहमदनगर जिल्हा न्यूज अपडेट

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून देशीदारूच्या ठराविक मात्रेने कोरोना झालेला रुग्ण बरा होत असल्याचा दावा केला होता. आतापर्यंत पन्नासवर रुग्ण आपण या देशीदारूच्या काढ्याने बरे केले असेही त्यांनी सांगितले होते. मात्र आता आरोग्य यंत्रणेने याबाबत चौकशी सुरू करताच डॉ. भिसे यांनी घुमजाव केले असून, आपण दारूने रुग्ण बरा होतो असा दावा केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

देशीदारूचा काढा कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त असल्याचा दावा करणाऱ्या 'त्या' डॉक्टरचे घुमजाव

author img

By

Published : May 14, 2021, 10:15 PM IST

Updated : May 15, 2021, 1:24 PM IST

अहमदनगर- जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील डॉ. अरुण भिसे यांनी गेल्या आठवड्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून देशीदारूच्या ठराविक मात्रेने कोरोना झालेला रुग्ण बरा होत असल्याचा दावा केला होता. आतापर्यंत पन्नासवर रुग्ण आपण या देशीदारूच्या काढ्याने बरे केले असेही त्यांनी सांगितले होते. मात्र आता आरोग्य यंत्रणेने याबाबत चौकशी सुरू करताच डॉ. भिसे यांनी घुमजाव केले असून, आपण दारूने रुग्ण बरा होतो असा दावा केला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच कोणीही या पद्धतीने उपचार करू नये, असं आवाहन देखील त्यांनी केले आहे.

काय होता डॉ अरुण भिसे यांचा व्हायरल दावा?

बोधेगाव येथील डॉ. भिसे यांनी काही दिवसांपूर्वी स्वानुभवावरून व्हाट्सऍपच्या माध्यमातून एक पोस्ट व्हायरल केली होती. या पोस्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, एका साठ वर्षीय महिलेला कोरोना झाला होता, ती अत्यवस्थ होती, तीने खानेपिणे देखील सोडले होते. मात्र या महिलेला बेड मिळाला नाही. शेवटी कोणाच्या तरी सल्ल्यावरून या महिलेच्या नातेवाईंकानी महिलेला औषध म्हणून रोज 60 एमएल देशी दारूचा काढा पाजला, आणि त्याचा तिच्यावर सकारात्मक परिणाम होऊन महिला बरी झाली. ही माहिती जेव्हा डॉ. भिसे यांना कळाली तेव्हा त्यांनी गुगलवर याबाबत माहिती घेतली, मात्र आतापर्यंत कोणत्याही आरोग्य संशोधन संस्थेने अल्कोहोल हा कोरोनावर उपचार असल्याचे म्हटले नव्हते. मात्र आपण रुग्णांच्या संमतीने तीस एमएल देशीदारू सकाळ-संध्याकाळ पाण्यात देण्याचा सल्ला दिला. यात शंभर टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले. दहा टक्के रुग्णांची तब्येत खालावली असताना त्यांना देखील फायदा झाला, असा दावा या पोस्टमध्ये करण्यात आला होता. या पोस्टमध्ये रुग्णांनी आपल्या संमतीने हा काढा घेतल्याचे स्पष्ट केले होते. यावर संशोधन होण्याचे गरज असल्याचे देखील ते म्हटले होते, या काढ्यासोबतच आरोग्य यंत्रणेने सूचवलेले औषधे देखील आपण रुग्णांना देत होतो असंही त्यांनी सांगितले आहे.

तहसीलदार, ग्रामीण रुग्णालयाने मागितला खुलासा

याबाबत सोशल मीडियात मोठी चर्चा सुरू होताच, शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ रामेश्वर काटे, तहसीलदार अर्चना पागिरे यांनी गंभीर दखल घेत, डॉ भिसे यांना लेखी खुलासा सादर करण्यास सांगितले होते. याबाबत कारवाईचे अधिकार हे जिल्हा शल्यचिकित्सक यांना आहेत. डॉ. भिसे यांच्या अजब दाव्याला कसलाही शास्त्रीय आधार नाही. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना रुग्णाला अल्कोहोलपासून दूर राहण्याचा स्पष्ट सल्ला दिलेला आहे. कोणत्याही तज्ज्ञाने आतापर्यंत यास संमती दिलेली नाही, किंवा तसे कोणतेही संशोधन अधिकृत नसताना आणि दारू ही आरोग्यास घातक असताना रुग्णांना तसा सल्ला देत उपचार करणे विघातक, बेकायदेशीर आणि रुग्णाच्या जीवाशी खेळणारे असल्याचे समोर येत असल्याने, आरोग्य यंत्रणेने डॉ. भिसे यांना तातडीने प्रत्यक्ष भेटून खुलासा देण्याचे आदेश दिले होते.

कारवाईच्या भीतीने डॉ. भिसे यांचा युटर्न?

याबाबत जिल्ह्यात मोठी चर्चा होत असताना आणि आरोग्य यंत्रणेने खुलासा मागताच एकूण प्रकरणाची गांभीर्यता ओळखत, डॉ. भिसे यांनी स्थानिक आरोग्य प्रशासनाला खुलासा सादर केला. त्यात त्यांनी, फक्त आणि फक्त दारूच्या काढ्याने कोरोना बरा होतो असा कधीही दावा केला नव्हता. कोणीही यापद्धतीने उपचार घेऊ नये, घेतल्यास त्यास आपण जबाबदार नाही असे सांगितले आहे. माझ्या सोशल माध्यमातील पोस्टचा गैरअर्थ काढून कोणीही दारूचा वापर करू नये, आपण अलोपॅथीची औषधें रुग्णांना दिलेली आहेत. कोणतेही उपचार हे कोरोना टास्क फोर्सच्या मान्यतेने असतात असे खुलाशात म्हंटले आहे. चुकीचे दावे आणि उपचार केल्यास त्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे जिल्हा शल्यचिकित्सक यांना असतात. त्यामुळे शेवगाव तालुका यंत्रणेने डॉ भिसे यांनी सादर केलेला खुलासा जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे पाठवला आहे. आता जिल्हा शल्यचिकित्सक यावर काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

हेही वाचा - क्राईम कॅपिटल पुन्हा हादरले.. सहा तासात दुसरा खून, महिलेची गळा चिरून हत्या

Last Updated : May 15, 2021, 1:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.