अहमदनगर - मराठी नववर्षाची सुरवात आज ठिकठिकाणी गुढी - तोरण उभारून केली जाते. शिर्डीच्या साईबाबा मंदिरावरच्या ( Gudi sai baba temple ) कलशावर आज गुढी उभारण्यात आली. साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते साई मंदिरावर गुढी आणि पंचागाची विधीवत पुजा करून श्रद्धेची गुढी उभारण्यात आली.
हेही वाचा - VIDEO : संगमनेर तालुक्यातील बोरबन गावातील जमिनीला पडल्या भेगा
आज सकाळी साडेसहा वाजता साईबाबा मंदिराच्या कळसा जवळ साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व त्यांचे पती संजय यांनी विधीवत पुजा केली. साई मंदिरातील सर्व धार्मिक पुजा विधी पंचागाप्रमाणे चालतात. यावेळी नवीन पंचागाची विधीवत पुजा साई मंदिराचे मुख्य पुजारी बाळकृष्ण जोशी यांनी पौरोहित्य केले. आज साईबाबांना सोन्याच्या अलंकारांसह साखरेच्या गाठींचा खास श्रुंगार करण्यात आला होता.
मराठी नववर्षाच्या निमित्ताने शिर्डी पंचक्रोशीतील, तसेच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात साईभक्तांनी शिर्डीत येऊन साईंबाबांचे दर्शन घेतले. गुढीपाडव्याच्या दिवशी कडू लिंबाच्या पाणाला विशेष महत्व आहे. कडू लिंब हे कडू असले तरी तो आरोग्यास हितकारक असतो. साईबाबांनीही आपल्या जीवनात अनेक कडू घटना पचवत जनमानवाला संदेश दिला. आज साईंच दर्शन घेत अनेक नवीन संकल्प या मराठी नववर्षाच्या निमित्ताने साईभक्त करतात.
हेही वाचा - Biometric pass Sai Baba Temple: आता भक्तांना थेट साई मंदिरात जाता येणार.. बायोमेट्रिक पास व्यवस्था होणार बंद