अहमदनगर - साईगाव पालखी मंडळाच्या वतीने युवती आणि महिलांनी कोपरगाव शहरात मराठी नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले. त्यांनी शहरात दुचाकी वरून रॅली काढून महिला सबलीकरण आणि मतदान जागृतीविषयक फलक हातात घेऊन प्रबोधन केले.
कोपरगाव शहरातील महिला आणि युवतींनी मराठी नूतन वर्षाचे स्वागत अनोख्या अंदाजात केले. आज गुढीपाडव्यानिमित्त सातशेवर महिला आणि युवती मराठमोळ्या अंदाजात सजून कोपरगाव तहसील कार्यालयाजवळील प्रांगणात जमा झाल्या. यानंतर त्यांनी दुचाकीवरून संपूर्ण शहरात रॅली काढण्यात आली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि साईनाथ महाराजांच्या नावाची जयघोष केला. तसेच स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ, लेक वाचवा-लेक शिकवा, पर्यावरणाशी नाते जोडा, मतदार जागृतीविषयी हातात फलक घेऊन प्रबोधन केले.