ETV Bharat / state

अहमदनगर : लांडग्याच्या हल्ल्यात आजीसह नात गंभीर जखमी, नागरिकांत भीतीचे वातावरण - Wild beasts attack ahmednagar news

रणखांबच्या लांडगदरा येथील गोरख रंगनाथ गुळवे यांची पत्नी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघी घरासमोरील अंगणात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक लांडग्याने हल्ला चढवत चंद्रकला यांच्या डाव्या हाताच्या पंज्याचा जोराचा चावा घेतला. त्यानंतर जवळच असलेल्या ऋतुजावरही जोरदार हल्ला चढवत तिची मान, चेहरा व हाताला गंभीर दुखापत केली.

लांडग्याच्या हल्ल्यात आजीसह नात गंभीर जखमी

author img

By

Published : Oct 4, 2020, 12:39 PM IST

अहमदनगर - जंगली श्वापदांचा संचार मानवी वस्तीकडे वाढल्याने हल्ल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. संगमनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास अशीच एक घटना समोर आली आहे. तालुक्यातील पठार भागातील रणखांब गावांतर्गत असलेल्या लांडगदरा येथे लांडग्याने धुमाकूळ घातला. त्याने एका आजीसह नातीलाही गंभीर जखमी केले. तर, चार जनावरांवर हल्ला देखील केला, यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रणखांबच्या लांडगदरा येथील गोरख रंगनाथ गुळवे हे शेतकरी आपल्या कुटुंबासोबत राहतात. शुक्रवारी दुपारी त्यांची पत्नी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघी घरासमोरील अंगणात काम करत होत्या. त्याचवेळी अचानक लांडग्याने हल्ला चढवत आजी चंद्रकला यांच्या डाव्या हाताचे बोट तोडत हाताच्या पंज्याचाही जोराचा चावा घेतला. त्यानंतर जवळच असलेल्या ऋतुजावरही जोरदार हल्ला चढवत तिची मान, चेहरा व हाताला गंभीर दुखापत केली. त्यामुळे दोघेही रक्तबंबाळ झाल्या होत्या. आजी चंद्रकला यांनी जोरजोराने आरडाओरड केल्याने आजूबाजूला असलेल्या काही नागरिकांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेत लांडग्याला पिटाळून लावले. त्यानंतर लांडग्याने परिसरातील शेतकरी अर्जुन मच्छिंद्र गुळवे यांच्या दोन गायी, वासरू आणि शेळीवर हल्ला करत त्यांनाही गंभीर दुखापती केल्या.

दिवसभर लांडग्याने रणखांब परिसरात धुमाकूळ घातला. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या आजी चंद्रकला व नात ऋतुजा या दोघींवर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. रणखांब परिसरात लांडग्यांचे दर्शन होण्याबरोबरच हल्ले होत असल्याने ग्रामस्थांनी वन विभागाकडे या जंगली श्वापदांचा मानवी वस्तीकडे होणारा संचार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा बिबट्यांबरोबर लांडग्यांच्या दहशतीने घराबाहेर पडणेही मुश्किल होईल, अशी भीतीदेखील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - अहमदनगर जिल्ह्यात 'लाल परी' सुसाट; सप्टेंबर महिन्यात कमावले 'इतके' कोटी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.