ETV Bharat / state

Governor Bhagat Singh Koshyari in Shirdi : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अहमदनगर दौऱ्यावर; शिर्डीत साईसमाधीचे घेतले दर्शन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन झाले. ( Governor Bhagatsingh Koshyari on Ahmednagar Visit ) भगतसिंह कोश्यारी यांनी शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. ( Bhagatsingh Koshyari Took Shirdi Sai Samadhi Darshan )

author img

By

Published : Jan 30, 2022, 8:00 PM IST

Updated : Jan 30, 2022, 10:38 PM IST

Governor Bhagat Singh Koshyari in Shirdi took sai samadhi darshan
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शिर्डीत साईसमाधीचे घेतले दर्शन

शिर्डी (अहमदनगर) - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी दोन दिवसीय अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर आहेत. ( Governor Bhagatsingh Koshyari on Ahmednagar Visit ) शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन झाले. भगतसिंह कोश्यारी यांनी शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. ( Bhagatsingh Koshyari Took Shirdi Sai Samadhi Darshan ) यावेळी कोश्यारी यांनी साईबाबांच्या समाधीवर गुलाबी रंगाची शॉल चढवली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिर्डीत साईसमाधीचे दर्शन घेतले
यावेळी साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी कोश्यारी यांचा शॉल, साई मूर्ती देऊन सन्मान केला. तर शिर्डी ग्रामस्थांनीही राज्यपाल कोश्यारी यांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले. यावेळी शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी शासकीय विश्रामगृह येथे आज मुक्कामी आहेत. तर उद्या सकाळी 7 वाजताही ते साईबाबा समाधीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर पुढील दौऱ्याची सुरुवात करणार आहे. राज्यपाल आज शनि शिंगणापुरलाही जाणार होते. मात्र, ऐन वेळी त्यांचा शनि शिंगणापुर दौरा रद्द झाल्याचे समजत आहे.

काही महिन्यांपूर्वी साई दर्शनाविना परत जावे लागले -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आजपासुन दोन दिवस अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असल्याने शिर्डीत मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्या पूर्वी एका कार्यक्रमा दरम्यान राज्यपाल शिर्डी दौऱ्यावर आले होते. मात्र, त्यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कोरोनामुळे 65 वर्षांवरील भाविकांना आणि 10 वर्षांखालील मुलांना साईबाबा मंदिरात दर्शनासाठी बंदी घातली होती. यामुळे राज्यपाल यांना साई दर्शनाविना परत जावे लागले होते.

हेही वाचा - Nana Patole On Gandhi Killing : नाना पटोले म्हणाले, नथुराम गोडसेने महात्मा गांधींचा 'वध' केला

Last Updated : Jan 30, 2022, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.