शिर्डी - "रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा" हा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीतील एक कन्या चक्क विना मोबदला शिर्डी साईबाबा संस्थानच्या कोविड सेंटर मध्ये कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहे.
आज संपुर्ण जगावर कोरोना महामारीचे संकट आले असल्याने आरोग्य विभागावर मोठे संकट ओड़ावले आहेत. कारण या कोरोनाच्या संकटकाळी एकीकडे आरोग्य विभागात आवश्यक तो डॉक्टर, नर्सेस स्टाफ उपलब्ध होत नाही. त्यातच शिर्डीतील पायल रामेश्वर घोडके ही कन्या एसएनडी कॉलेज येवला येथे नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून कॉलेज बंद असल्याने ती सध्या घरी आहे. आपल्या शिक्षणाचा गरजूंना उपयोग व्हावा यासाठी तिने साईबाबा संस्थानचा कोविड सेंटरला विनामोबदला सेवा देण्याची इच्छा प्रांताधिकारी गोविंद शिंदे आणि तहसीलदार कुंदन हिरे यांच्याकड़े व्यक्त केली. तहसिलदार शिंदे यांनीही या मुलीचे कौतुक करत तिची साईबाबा संस्थानचा कोविड सेंटर मध्ये नेमणूक केली असून पायल गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करत आहे.
साईबाबांच्या मंदिरा पासून पायल अवघ्या दोनशे मीटरच्या अंतरावर राहत असून पायलचे वडील रामेश्वर हे साईबाबा मंदिरा जवळ साईबाबांची मूर्ती तसेच अन्य वस्तूंची विक्री करत प्रपंच चालवतात. मात्र, कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे साई मंदिर भाविकांना साई दर्शनासाठी मंदिर बंद आहे. त्यामुळे भाविकच शिर्डीत येत नसल्याने आपल्याकडील वस्तू कोणीही खरेदी करत नसल्यामुळे रामेश्वर हे गवंडीकाम करत आहेत. तसेच पायलची आईही घरी बसून आहेत. आज पायलची घरची हलाखीची परिस्थिती असूनही कोरोना संकटकाळात मोफत रुग्ण सेवा देत आहे. यामुळे पायलचे सर्वच थरातून कौतुक केले जात आहे. राज्यात आणि देशात पायल सारखे अनेक तरूण आहेत. त्यांनी देखील या काळात घरात न बसता पुढे येऊन रुग्णाची सेवा करावी असे आवाहन यावेळी पायलनी केले आहे.
पायल घोडगे सारख्या राज्यात जिल्ह्यात असंख्य मुली मुले असतील त्यांनी या कठीण काळात रुग्णसेवेसाठी पुढे आल्यास कोरोनाचा संघर्ष कमी होईल, आणि आपल्या या सेवेमुळे अनेक रुग्णाचे प्राण वाचन्यास मद्दत होईल यामुळे आपण सर्वाने पुढे येवून शासनाला मद्दत करण्याचे आहवान यावेळी शिर्डी प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.