अहमदनगर - जिल्ह्यात नेवासा तालक्यातील रामडोह येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना घटली आहे. येथे एका विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
दुसऱ्यांदा केला अत्याचार -
तीन महिन्यापूर्वी पीडित विवाहित महिलेचे पती, मुली आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. दरम्यान महिला घरी एकट्याच होत्या. यावेळी चार आरोपींनी याचा फायदा घेत तिच्यावर अत्याचार केला व तिला जिवे मारण्याची धमकी दिली. ती पीडित महिला धमकीच्या भीतीने शांत बसली. मात्र आरोपीने दुसऱ्यांदा ती शेतात एकटी असताना तिचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून पीडितेने आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.