ETV Bharat / state

तब्बल 105 अनाथ मुलांचा मायबाप... गणेश दळवी यांच्या साई आश्रय परिवाराची प्रेरणादायी कथा - Ganesh Dalvi Shirdi

परभणी जिल्ह्यातील सेलू येथील एका आत्महत्याग्रस्त शेतमजुराची चार बालके आणि आई यांनाही गणेश दळवी यांनी साई आश्रय परिवारात आधार दिला. त्यामुळे या सर्वांना नवीन जीवन मिळाले आहे.

गणेश दळवी साई आश्रय परिवार शिर्डी
साई आश्रय परिवार शिर्डी
author img

By

Published : Mar 5, 2020, 2:06 PM IST

अहमदनगर - स्वतःचा लॉन्ड्रीचा व्यवसाय सांभाळून त्यातून मिळणारी निम्मी रक्कम अनाथालयासाठी खर्च करत गणेश दळवी तब्बल 105 अनाथ मुलांचे मायबाप झाले आहेत. शिर्डीतील साई आश्रय परिवाराच्या माध्यमातून गणेश दळवी ही सेवा करत आहेत. साईबाबांची शिकवण अंगिकारून आपण हे कार्य करत असल्याचे दळवी सांगत आहेत.

शिर्डीतील गणेश दळवी यांच्या साई आश्रय परिवाराची प्रेरणादायी कथा...

हेही वाचा... सहिष्णाच्या सहिष्णुतेने उजळले 'जिजा'चे भाग्य..! आठव्या 'नकोशी'ला मिळाले आई-वडिलांचे छत्र

अहारोत्र दुसऱ्याच्या शेतात कष्ट करूनही मुलांचे आणि आपले पोट भरता येत नाही, यामुळे आलेल्या नैराश्यातून परभणी जिल्ह्यातील खपटी गावातील तुकाराम हारके (३४) आणि त्याची पत्नी सविता हारके (२९) यांनी आत्महत्या केली. त्यांच्या मागे त्यांची चार मुले आणि आई होती. तुकाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोणताही आधार राहिला नव्हता. मात्र, शिर्डी आणि शिर्डी बाहेरील अशा असहाय्यांचा सांभाळ करणारे गणेश दळवी यांना ही माहिती समजल्यानंतर ते त्या गावी गेले. त्यांनी त्या गावातील भागवत (९ महिने) गायत्री (२ वर्षे) ईश्वरी (६ वर्षे ) वैष्णवी (९ वर्षे) या मुलांना व त्यांच्या आजीला शिर्डीतील आपल्या साई आश्रय परिवारात आणले.

गणेश दळवी यांनी शिर्डीत आतापर्यंत अशा शंभरहुन अधिक निराधार मुलांना आधार दिला आहे. तसेच दहा वयोवृद्ध महिला-पुरुषांनाही ते सांभाळत आहेत. या सर्वांसाठी वर्षाकाठी त्यांना 12 लाख रुपये खर्च येतो. मात्र, गणेश दळवी आपल्या व्यवसायातुन मिळालेली पन्नास टक्के रक्कम या साई आश्रय परिवारासाठी तर उरलेली रक्कम आपल्या कुटुंबासाठी खर्च करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.