ETV Bharat / state

गांधी जयंती दिवशी सुरू असलेले दारू दुकान बंद करण्यास पाडले भाग..!

गांधी जयंती दिनी अकोले शहरात दारूचे दुकान सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले. पण, अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी थेट उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोनवरून या प्रकाराची माहिती दिली.

author img

By

Published : Oct 2, 2020, 10:30 PM IST

Updated : Oct 2, 2020, 10:56 PM IST

शिर्डी
शिर्डी

शिर्डी (अहमदनगर) - आज महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती असल्याने देशभरातील बार आणि दारूची दुकाने बंद ठेवत 'ड्राय डे' पाळला जातो. मात्र, अकोले शहरातील एका दारू व्यावसायिकाने आजही दारू दुकान सुरूच ठेवले होते. त्यामुळे अनेक जागृत व्यक्तींनी नाराजी व्यक्त केली. शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने थेट उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोन करून दारूचे दुकान बंद करण्यास भाग पाडले.

गांधी जयंती दिवशी सुरू असलेले दारू दुकान बंद करण्यास पाडले भाग

आजच्या गांधी जयंती दिनी अकोले शहरात दारूचे दुकान सुरू असल्याने सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला कळवले. पण, अधिकाऱ्यांनी त्यांना दाद दिली नाही. त्यामुळे त्यांनी थेट उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना फोनवरून या प्रकाराची माहिती दिली. मंत्री वळसे-पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची कानउघडणी केल्यानंतर उत्पादन शुल्कचे निरीक्षक रोहिदास वाजे, दुय्यम निरीक्षक पी.एन. कडभाने, ए.डी.यादव, कॉन्स्टेबल निमसे, शेख, पाटोळे यांच्या पथकाने सुरू असलेल्या जी.व्ही.आखाडे यांच्या सरकारमान्य दारू दुकानावर कारवाई केली. संबधित दारू दुकानाचा परवाना निलंबित करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला असल्याची माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी दिली.

हेही वाचा - ...तर त्याचा समूळ नाश निश्चित! बलात्कारांच्या घटनांवर योगींनी सोडले मौन

Last Updated : Oct 2, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.