ETV Bharat / state

दोस्त दोस्त ना रहा ! पैशासाठी मित्राचा गळा आवळून खून - murder

आर्थिक देवानघेवानीतून मित्रानेच आपल्या जिवलग मित्राची हत्या केल्याची घटना जामखेड येथील सौताडा घाटात घडली आहे.

दोस्त दोस्त ना रहा ! पैशासाठी मित्राचा गळा आवळून खून
author img

By

Published : May 8, 2019, 8:37 AM IST

अहमदनगर- आर्थिक देवानघेवानीतून मित्रानेच आपल्या जिवलग मित्राची हत्या केल्याची घटना जामखेड येथील सौताडा घाटात घडली आहे. याप्रकरणी १७ दिवसांनी मृताचे अवशेष सौताडा घाटात दगडाखाली आढळून आले. तपासात पुण्याहून नगरकडे येताना धावत्या वाहनात हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा पुणे येथील वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात येणार, असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अशी आहे घटना-

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २० एप्रिल रोजी मृत तेजस सुनिल भीसे (वय २८ रा, रहाटणी छत्रपती चौक पुणे) हा मित्र दत्तात्रय नवनाथ बिरंगळ (वय ३० सध्या रा. पुणे, मुळ रा. सोनेगाव ता जामखेड) याच्यासोबत कारमधून बाहेरगावी निघाला होता. त्याने मावसभाऊ निलेश मोरेच्या फोनवर मॅसेज पाठवून तशी माहिती कळवली होती. मात्र, तो घरी परतला नसल्याने तेजसच्या कुटुंबीयांनी पुणे येथील वाकड पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर भाऊ प्रविण भीसे याने ३० एप्रिल रोजी आरोपी दत्ता नवनाथ बिरंगळ व समाधान बिभिषण भोगल (वय २४ हल्ली, रा. जाधववाडी चिखली पुणे. मुळ रा. बोरगाव ता. करमाळा) यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.

वाकड पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ५ मे रोजी आरोपी दत्ता बिरंगळ व समाधान भोगल यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केला आसल्याची कबुली दिली आहे.

मृत तेजस जुन्या गाड्या खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्याने आपला मित्र दत्ता बिरंगळ यास चिखली येथे फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले होते. त्यामुळे तेजस बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैशाची गरज असल्याने आरोपीकडे पैशाची मागणी करत होता. त्यावेळी आरोपीने जामखेड येथे पैसे देतो, असे सांगून तेजसला गाडीत घेऊन जामखेडच्या दिशेने निघाले. त्यावेळी दत्ता बिरंगळ व समाधान भोगल यांनी गाडीमध्ये तेजस भिसे याचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह जामखेडजवळील सौताडा घाटात दगडाखाली टाकला व कपडे खर्डा रोडवरील राजुरी शिवारात लपवले. त्यानंतर गाडी पुण्यातील काळेवाडी येथे सोडून फरार झाले.

दोन्ही आरोपींनी अपहरण आणि खुनाची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना ७ मे रोजी जामखेड येथे घटनास्थळी आणले. या संबंधीची माहीती जामखेड पोलीस ठाण्यात नोंद केली. जामखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व सदर मृताचे अवशेष वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने, हे. कॉ. बाप्पु धुमाळ, बिभिषण कन्हेरकर, विक्रम कुदळे, विजय गंभीरे, यांच्या ताब्यात दिले.

Intro:अहमदनगर- उसने दिलेल्या पैशाचा तगादा केल्याने मित्राचा गळा आवळून खून. गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_8_may_ahm_trimukhe_1_friend_murder_jamkhed_v

अहमदनगर- उसने दिलेल्या पैशाचा तगादा केल्याने मित्राचा गळा आवळून खून. गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग..

अहमदनगर- आर्थिक देवानघेवानीतुन मित्रानेच आपल्या जिवलग मित्राची हत्या केल्याची घटना जामखेड येथील सौताडा घाटात घडली. या प्रकरणी सतरा दिवसानंतर मयताचे अवशेष सौताडा घाटात दगडाखाली आढळून आले. तपासात पुण्याहून नगर कडे येताना धावत्या वाहनात हत्या झाल्याचे निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली. 

 अशी आहे घटना-
-याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी दि २० एप्रिल रोजी मयत तेजस सुनिल भीसे (वय २८ रा रहाटणी छत्रपती चौक पुणे) आपला मित्र दत्तात्रय नवनाथ बिरंगळ (वय ३० हल्ली रा. पुणे, मुळ रा सोनेगाव ता जामखेड) याच्या सोबत बाहेरगावी कार मधुन निघाला. त्यावेळी त्याने मावसभाऊ निलेश मोरे याच्या फोनवर मॅसेज पाठवुन तशी माहिती कळवली होती. मयत तेजस ने मावसभावाला आपण दत्ता बिरंगळ सोबत धुळे-आमरावती येथे कार नं एम एच १२ एन एल ००९८ ने चाललो आहे असे सांगितले. मात्र संध्याकाळी तो घरी न परतल्याने दि २१ एप्रिलला तेजसच्या घरच्यांनी पुणे येथील वाकड पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल केली.त्यानंतर भाऊ प्रविण भीसे याने दि ३० एप्रिल रोजी आरोपी दत्ता नवनाथ बिरंगळ व समाधान बिभिषण भोगल वय २४ (हल्ली रा जाधववाडी चिखली पुणे) मुळ रा बोरगाव ता. करमाळा यांच्यावर वाकड पोलीस स्टेशनला अपहरणाची तक्रार दाखल केली.. वाकड पोलिसांनी तपास सुरू केल्या नंतर मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दि ५ मे रोजी आरोपी दत्ता बिरंगळ व समाधान भोगल यांना पोलिसांनी अटक केली. यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्हा केला आसल्याची कबुली दिली.
मयत हा जुन्या गाड्या खरेदी विक्री चा व्यवसाय करत होता. त्याने आपला मित्र दत्ता बिरंगळ यास चिखली येथे फ्लॅट घेण्यासाठी पैसे दिले होते. मात्र मयत भीसे यास बँकेचे हप्ते भरण्यासाठी पैशाची गरज आसल्याने तो आरोपीकडे पैशाची वारंवार मागणी करत होता. तेंव्हा आरोपी यांनी दि २० एप्रिल रोजी तुला जामखेड येथे पैसे देतो असे सांगून गाडीत घेऊन जामखेड च्या दिशेने निघाले. रस्त्यामध्येच आरोपी दत्ता बिरंगळ व समाधान भोगल यांनी गाडीमध्येच तेजस भिसे याचा गळा आवळून खून केला. यानंतर मृतदेह जामखेड जवळील सौताडा घाटात दगडाखाली टाकला व कपडे खर्डा रोडवरील राजुरी शिवारात लपवले व पुन्हा गाडी पुणे येथे घेऊन आले व काळेवाडी येथे सोडुन फरार झाले. दोन्ही आरोपींनी अपहरण आणि खुनाची कबुली दिल्या नंतर पोलिसांनी त्यांना
७ मे रोजी जामखेड येथे घटनास्थळी आणले. या संबंधीची माहीती जामखेड पोलिस स्टेशनला नोंद केली. जामखेड पोलिस स्टेशन चे साहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, नायब तहसीलदार नवनाथ लांडगे, वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व सदर मयताचे अवशेष वाकड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हरीष माने, हे.कॉ.बाप्पु धुमाळ, बिभिषण कन्हेरकर, विक्रम कुदळे, विजय गंभीरे, यांच्या ताब्यात दिले आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- उसने दिलेल्या पैशाचा तगादा केल्याने मित्राचा गळा आवळून खून. गुन्हा पुणे पोलिसांकडे वर्ग..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.