ETV Bharat / state

माजी खासदार दादा पाटील शेळके काळाच्या पडद्याआड, आज अंत्यसंस्कार

author img

By

Published : Nov 23, 2019, 7:45 AM IST

रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच आज रात्री दहाच्या सुमारास शेळके यांची प्राणज्योत मालवली.

दादा पाटील शेळके

अहमदनगर - जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी खासदार मारुती देवराम उर्फ दादा पाटील शेळके (वय 79) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज (शनिवारी) दुपारी ३ वाजता त्यांच्या खारेकर्जुने या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब, तसेच ३ मुली, असा परिवार आहे. रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच आज रात्री दहाच्या सुमारास शेळके यांची प्राणज्योत मालवली.

४ वेळा आमदार, तर २ वेळा खासदार -

दादा पाटील ४ वेळा आमदार आणि दोनदा खासदार होते. मात्र, त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांच्या वागणुकीत कोणताही डामडौल कधीच नव्हता. वयाच्या 21 व्या वर्षीच दादा पाटलांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. ते 1962 पासून 1978 पर्यंत सलग जिल्हा परिषद सद्स्य झाले. नगर तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही पदेही त्यांनी भूषविली. सन 1978 पासून 1994 पर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे 1994 व 1996 अशा दोन वेळा ते खासदारही झाले.

दादा पाटलांनी नगर तालुक्‍यातील वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अवघ्या ८ महिन्यात कारखाना उभा करून त्यांनी 2001 मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता. शेती व उसाच्या प्रश्‍नांबाबतचा त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा होता. नगर तालुक्‍यात सुमारे 30 माध्यमिक विद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. हीच विद्यालये स्वतःच्या संस्थेमार्फत सुरू केली असती, तर दादा पाटील तालुक्‍याचे 'शिक्षणसम्राट' झाले असते, असेही बोलले जाते. मात्र, त्यांनी शिक्षणाचा 'धंदा' केला नाही.

हे वाचलं का? - झारखंड : नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ३ पोलिसांना वीरमरण; १ गंभीर

दादा पाटील शेळके यांचा जीवनपट

  • जन्म - 2 ऑगस्ट 1941
  • गाव - खारेकर्जुने (ता. नगर)
  • शिक्षण - एस.एस.सी.
  • चार वेळा आमदार - (1978-94)
  • दोनदा खासदार - (1994 आणि 1996)

हे वाचलं का? - पाकिस्तानातून ६ वर्षांपूर्वी भारतात आलेल्या हिंदू कुटुंबाला भारत सोडण्याची नोटीस

दादा पाटलांनी भूषविलेली पदे -

  • जिल्हा परिषद सदस्य (1962-78)
  • पंचायत समिती उपसभापती, नगर (1962-64)
  • पंचायत समिती सभापती, नगर (1966-67)
  • जिल्हा सहकारी बँक अध्यक्ष (1991)
  • रोजगार हमी योजना समिती सदस्य
  • नगर तालुका देखरेख संघाचे अध्यक्ष
  • नगर तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष
  • रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य
  • नगर तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष

स्थापन केलेल्या संस्था

  • खारेकर्जुने विविध सहकारी संस्था
  • लोकहितवादी शिक्षण संस्था
  • नगर तालुका सहकारी साखर कारखाना
  • नगर तालुका सहकारी दूध संघ
  • नगर तालुका सहकारी दूधउत्पादक पतसंस्था
  • सीना वाहतूक सहकारी संस्था

Intro:अहमदनगर- ज्येष्ठ नेते मा.खा. दादा पाटील शेळके यांचे अल्पशा आजाराने निधनBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ex_em_shelake_died_image_7204297

अहमदनगर- ज्येष्ठ नेते मा.खा. दादा पाटील शेळके यांचे अल्पशा आजाराने निधन

अहमदनगर- जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते माजी आमदार व मा.खासदार मारुती देवराम तथा दादा पाटील शेळके (वय 79) यांचे शुक्रवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आज (शनिवारी) दुपारी तीन वाजता त्यांच्या खारेकर्जुने (ता. नगर) या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेळके यांच्या मागे पत्नी, जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक असलेले पुत्र रावसाहेब व तीन मुली, असा परिवार आहे. रक्तातील साखर वाढल्याने शेळके यांना नगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवस त्यांच्यावर पुण्यातही उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथे दाखल करण्यात आले होते. औषधोपचार सुरू असतानाच आज रात्री दहाच्या सुमारास शेळके यांची प्राणज्योत मालवली.

साधी राहणी-
दादा पाटील चार वेळा आमदार व दोनदा खासदार होऊनही त्यांची साधी राहणी जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यात कौतुकाचा विषय होता. त्यांच्या वागणुकीत कोणताही डामडौल कधीच नव्हता. वयाच्या 21व्या वर्षीच दादा पाटलांचा सक्रिय राजकारणात प्रवेश झाला. ते 1962 पासून 1978 पर्यंत सलग जिल्हा परिषद सदस्य झाले. नगर तालुका पंचायत समितीचे सभापती व उपसभापती ही पदेही त्यांनी भूषविली. सन 1978 पासून 1994 पर्यंत ते विधानसभेवर सलग निवडून गेले. पुढे 1994 व 1996 अशा दोन वेळा ते खासदारही झाले.
दादा पाटलांनी नगर तालुक्‍यातील वाळकी येथे सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. अवघ्या आठ महिन्यांत कारखाना उभा करून त्यांनी 2001मध्ये पहिला गळीत हंगाम सुरू केला होता. शेती व उसाच्या प्रश्‍नांबाबतचा त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. नगर तालुक्‍यात सुमारे 30 माध्यमिक विद्यालये स्थापन करून स्थानिक संस्थांकडे सुपूर्द केली. हीच विद्यालये स्वतःच्या संस्थेमार्फत सुरू केली असती, तर दादा पाटील तालुक्‍याचे "शिक्षणसम्राट' झाले असते; परंतु त्यांनी शिक्षणाचा "धंदा' केला नाही.

दादा पाटील शेळके यांचा जीवनपट
- जन्म ः 2 ऑगस्ट 1941
- गाव ः खारेकर्जुने (ता. नगर)
- शिक्षण ः एस.एस.सी.
- चार वेळा आमदार (1978 ते 94)
- दोनदा खासदार (1994 व 1996)

भूषविलेली पदे
- सदस्य, जिल्हा परिषद (1962-78)
- उपसभापती, पंचायत समिती, नगर (1962-64)
- सभापती, पंचायत समिती, नगर (1966-67)
- अध्यक्ष, जिल्हा सहकारी बॅंक (1991)
- सदस्य, रोजगार हमी योजना समिती, महाराष्ट्र
- अध्यक्ष, नगर तालुका देखरेख संघ
- अध्यक्ष, नगर तालुका सहकारी दूध संघ
- सदस्य, उत्तर विभागीय सल्लागार समिती, रयत शिक्षण संस्था
- अध्यक्ष, नगर तालुका सहकारी साखर कारखाना

स्थापन केलेल्या संस्था
- खारेकर्जुने विविध सहकारी संस्था
- लोकहितवादी शिक्षण संस्था
- नगर तालुका सहकारी साखर कारखाना
- नगर तालुका सहकारी दूध संघ
- नगर तालुका सहकारी दूधउत्पादक पतसंस्था
- सीना वाहतूक सहकारी संस्था

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- ज्येष्ठ नेते मा.खा. दादा पाटील शेळके यांचे अल्पशा आजाराने निधन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.