अहमदनगर - माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांचे वयाच्या 94 वर्षी आज पहाटे वृद्धापकाळाने दुःख निधन झाले आहे. त्यांचा अंत्यवविधी आज सायंकाळी 4.30 वाजता कोपरगाव येथील संजीवनी इंजिनीअरिंग कॉलेज येथे होणार आहे. माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी 1960 मध्ये सहकाराच्या माध्यमातून कोपरगाव येथे संजीवनी सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आणि तेथूनच खऱ्या अर्थाने या शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा वसा त्यांनी घेतला.
राज्याला दिले पायलट प्रकल्प -
सहकाराच्या माध्यमातून माजी मंत्री शंकरारराव कोल्हे यांनी रासायनिक प्रकल्प यशस्वी करत राज्याला अनेक पायलट प्रकल्प दिले. 1972 मध्ये त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभेची उमेदवारी केली आणि कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व खऱ्या अर्थाने येथून सुरू झालं. 1985 ते 1990 चा अपवाद सोडता ते सहा दशके आमदार होते. 1999 ते 2004 या काळात त्यांनी कोपरगावच्या विकासाचे 729 तारांकित प्रश्न, 21 लक्षवेधी सूचना आणि 40 ठराव मांडले. 1989 ते 2004 या काळात शंकरराव कोल्हे यांनी कोट्यवधी रुपयांचा शासकीय निमशासकीय निधी उपलब्ध करून असंख्य विकासाची कामे मार्गी लावली आहेत. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरीची मुले देश-विदेशात उच्च पातळीवर काम करताना दिसली पाहिजे यासाठी त्यांनी कोपरगावात संजीवनी अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन महाविद्यालय उभे करून त्यात कालानुरूप बदल घडवत विविध अभ्यासक्रम आणले आणि शेतकऱ्याच्या मुलाला शिकवले, त्याला प्रगतीचा मार्ग दाखवला. डॉ. मिलिंद, नितीन, बिपीन, अमित, विवेक, सुमित आदींनी शंकरराव कोल्हे यांचा विचार विचार पुढे नेण्यात यश मिळवले.
जनतेसोबत नाळ -
पूर्वी परिस्थिती जेमतेम होती. पण जनतेच्या विकासाची नाळ, तळमळ माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांना होती. त्यात त्यांना वसंतदादा पाटील सुधाकरराव नाईक शरद पवार विलासराव देशमुख सुशीलकुमार शिंदे, अ. र. अंतुले दादा पाटील शेळके शिवाजीराव नागवडे, मारुतराव घुले, भाऊसाहेब थोरात, यशवंतराव गडाख, बाळासाहेब विखे, शंकरराव काळे, बाळासाहेब भारदे, स्वामी सहजानंद भारती आदींच्या विचारांची साथ मिळाली. सिंह ही त्यांच्या पहिल्या अपक्ष निवडणुकीची निशाणी होती आणि सुरूवात ते आज पर्यंत सिंह म्हणूनच राहिले. त्यांनी सहा पंचवार्षिक विधिमंडळात अधिराज्य गाजवलं. शंकरराव कोल्हे यांनी विधिमंडळाची पायरी ही विकासाची पायरी मानत कोपरगावच्या विकासाचे प्रश्न विधिमंडळाच्या वेशीला टांगत सोडून घेतले. या सहा दशकात त्यांना महसूल, कृषी, परिवहन, उत्पादन शुल्क मंत्रिपदी काम करण्याची संधी मिळाली. त्याचे त्यांनी सोने केले. त्यांच्या जाण्याने तालुक्यात एकच शोककळा पसरली आहे.
- शंकरराव कोल्हे यांचा जीवनपट -
नांव - श्री. शंकरराव गेनूजी कोल्हे
जन्मतारीख- 24 मार्च 1929
घरचा पत्ता- मु. पो. येसगांव, ता. कोपरगांव जि. अहमदनगर
कार्यालयीन पत्ता- सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर
कारखाना लि., सहजानंदनगर, पो. शिंगणापुर, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर
शिक्षण - बी. एस्सी (ऍ़ग्री) पूणे विद्यापीठ 1950, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे शेती विषयक अभ्यासक्रमाचे 6 महिने प्रशिक्षण. युरोप मध्ये 3 महिने उच्च शिक्षणाचे प्रशिक्षण.
व्यवसाय-शेती.
----------------------------
राजकीय प्रवास
1950 -सरपंच, येसगांव ग्रामपंचायत (ता.कोपरगांव) जि. अहमदनगर.
1953-1960 -अध्यक्ष, कोपरगांव तालुका विकास मंडळ (टी.डी.बी) (Taluka Development Board)
1959 - अध्यक्ष, दि. कोपरगांव सहकारी साखर कारखाना लि. गौतमनगर,
पो. कोळपेवाडी, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर (कोसाका) (आताचा कर्मवीर श्ंकरराव काळे सह.साखर कारखाना लि.)
1962 ते आजपर्यंत- संस्थापक अध्यक्ष, विद्यमान संचालक सहकारमहर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि, सहजानंदनगर, पो. शिंगणापुर, ता. कोपरगांव,
जि. अहमदनगर. (पुर्वीचा संजीवनी सहकारी साखर कारखाना).
दिनांक 29.12.1969 ते 29.12.1971-उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर
कारखाना संघ लि. मुंबई.
दिनांक 29.12.1971 ते 29.04.1975-अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई.
1973 ते 2004 -विद्यमान संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि. मुंबई.
1972 -अध्यक्ष, शेतीमाल प्रक्रिया व विक्री वितरण अभ्यास समिती (कॅबीनेट दर्जा).
1972 ते 1984- व 1990 ते 2004-सदस्य, महाराष्ट्र राज्य विधानसभा, मुंबई (1972-अपक्ष, 1978-काँग्रेस (आय), 1980-काँग्रेस (आय),1990-काँग्रेस (आय), 1995-काँग्रेस (आय),1999-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,)
1975 ते 2020पर्यंत- मॅनेजींग कौन्सील सदस्य,रयत शिक्षण संस्था,सातारा.
1999- हंगामी सभापती, महाराष्ट्र राज्य विधानसभा, मुंबई.
1975-1976- अध्यक्ष, इंडियन शुगर इंडस्ट्रीज इंपोर्ट ऍ़ण्ड एक्सपोर्ट कॉर्पाेरेशन लि. नवी दिल्ली.
1977-1979- खंडकरी शेतकऱ्यांच्या जमीनी मिळविण्यांसाठी आंदोलन त्यात तीन महिने अहमदनगर विसापुर कारागृहात कारावासाची शिक्षा भोगली.
1975 ते आजपर्यंत- संस्थापक संचालक, वसंतदादा शुगर इन्स्टीटयुट मांजरी बुद्रुक, ता. हवेली, जि. पुणे.
1976 ते 2014-संचालक, इंडियन शुगर इंडस्ट्रीज इंपोर्ट ऍ़ण्ड एक्सपोर्ट कॉर्पाेरेशन लि. नवी दिल्ली.
1975-1980- संस्थापक अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनियरींग को. ऑप. लि. पुणे.
1976 -संस्थापक, गोदावरी खोरे सहकारी दुध उत्पादक संघ लि, सहजानंदनगर
पो.शिंगणापुर, ता. कोपरगांव, जि. अहमदनगर.
1981-1988- संस्थापक अध्यक्ष, नॅशनल हेवी इंजिनियरींग को. ऑप. लि. पुणे.
1988 ते आजपर्यंत - संचालक, नॅशनल हेवी इंजिनियरींग को.ऑप. लि. पुणे.
1983-1984 -संस्थापक अध्यक्ष, संजीवनी एज्युकेशन सोसायटी सहजानंदनगर, पो. शिंगणापुर, ता. कोपरगांव.जि. अहमदनगर.
1983-1984- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लोकनाटय समिती, मुंबई.
1983-1984- संचालक, अहमदनगर जिल्हा सहकारी बँक लि.
1986 - संस्थापक अध्यक्ष, यशवंत कुक्कूट पालन सहकारी व्यावसायिक संस्था मर्यादित वसंतनगर. (येसगांव) ता. कोपरगांव, जि. अहमदनगर.
1989-1990- अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी मुद्रणालय, पुणे.
1990 -मंत्री, कृषि व फलोत्पादन, सहकार महाराष्ट्र राज्य,मुंबई.
1991- मंत्री, महसुल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
1992-1993 -मंत्री, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क,कमाल जमीन धारणा, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
1996 -संस्थापक अध्यक्ष, साई संजीवनी सहकारी बँक लि. कोपरगांव, जि. अहमदनगर. (पुर्वीची देवयानी बँक)
1992- संस्थापक, संजीवनी प्रि कॅडेट (सैन्यदल भरती) ट्रेनिंग सेंटर, सहजानंदनगर, पो. शिंगणापुर, ता. कोपरगांव जि. अहमदनगर.
2006 ते 18.12.2012-व्हा. चेअरमन, नॅशनल फेडरेशन को. ऑप. शुगर फॅक्टरीज्, नविदिल्ली.
19.12.2012 -2014 -संचालक, नॅशनल फेडरेशन, नविदिल्ली.
2000 ते 2004-सदस्य, महाराष्ट्र राज्य विधानसभा नियम समिती सदस्य, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक उपक्रम समिती, मुंबई.
2000 -संस्थापक अध्यक्ष, इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर, कोपरगांव (शिंगणापुर) जि. अहमदनगर. (गॅट कराराचा अभ्यास करण्यांसाठी स्थापन केलेली समिती)
2001 -सदस्य, महाराष्ट्र शासन जागतिक व्यापार आंतरराष्ट्रीय शेती करार कार्यकारी कृती गट, मुंबई.
2001-2004 -सदस्य, महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन विनियमन सुधारणा विधेयक संयुक्त समिती, मुंबई.
2002-2004- अध्यक्ष, ऊर्जा, उद्योग, रोजगार हमी स्थायी समिती महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.
2003 -सदस्य, शासकीय व अशासकीय विधेयक समिती, महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.
2003-2004- सदस्य, सार्वजनिक उपक्रम समिती महाराष्ट्र विधानसभा, मुंबई.
2003-2004 -सदस्य, वीजमंडळ एक्सपर्ट कमिटी,महाराष्ट्र विधानसभा मुंबई.
2003 -सचिव, गोदावरी कालवे, नांदुरमध्यमेश्वर जलद कालवा पाटपाणी संघर्ष समिती, कोपरगांव.
2004-2012 -ऊपाध्यक्ष, श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, ता. राहाता जि. अहमदनगर.
2007-2010 -सदस्य, भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नविदिल्ली.
09.05.2017 ते 27.06.2020 पर्यंत -उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था सातारा.
इतर विशेष
1. उर्ध्व गोदावरी खो-यात गोदावरी कालव्यांना शेतीसाठी कमी पडणांऱ्या पाण्यांच्या निर्मीतीसाठी मुकणे, मुकणे उंचीवाढ, आळंदी, कडवा, वालदेवी, काश्यपी, गौतमी-गोदावरी, भाम, भावली, वाकी ही धरणांची कामे हाती घेवुन त्याच्या पुर्णत्वासाठी शासनस्तरावर वारंवार पाठपुरावा करून 500 कोटी रूपयांचा आर्थीक निधी मिळवुन 15 टी. एम. सी पाण्यांची नवनिर्मीती. तसेच पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळविण्यांसाठी शासनस्तरावर 1968 पासुन लढा., सन 2000 मध्ये विधीमंडळात त्यास मान्यता., तर नाशिक शहरवासियांना पिण्यांच्या पाण्यांसाठी नव्यांने किकवी धरण प्रस्तावीत करून त्याकामी पाठपुरावा केला.
2. इंटरनॅशनल फोरम फॉर इंडियन ऍ़ग्रीकल्चर या संस्थेच्या माध्यमांतुन भारतीय शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय शेती व्यापार (गॅट) करारात संरक्षण मिळावे म्हणुन 2003 मध्ये मेक्सीकोतील कॅनकुन येथे पार पडलेल्या जागतिक व्यापार संघटनेच्या (World Trade Organisation) पाचव्या बैठकीत प्रतिनिधींचा सहभाग व सादरीकरण.
3. राज्यातील शेतक-यांचे फळे, भाजीपाला, फलोत्पादन वाढ व निर्यातीसाठी सन 1989 मध्ये कोल्हे समितीचा अहवाल महाराष्ट्र शासनांकडे सादर त्यातील महत्वपुर्ण बाबींवर सन 2009 पासून अंमलबजावणी सुरू.
4. कोपरगांव शहर व तालुक्यातील गोर-गरीब रूग्णांना वैद्यकिय सेवेसाठी 6 कोटी 50 लाख रूपये खर्च करून 50 खाटांचे अद्यावत सुसज्ज ग्रामिण रूग्णालयाची निर्मीती.
5. एक कोटी रूपये खर्चाचे कोपरगांव तालुका क्रिडा संकुल.
6. कोपरगांव तालुक्यातील शेती व पिण्याचे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत सुमारे 8 कोटी 42 लाख 95 हजार रूपये खर्च करून हिंगणी, मंजूर व सडे असे तीन कोल्हापुर पध्दतीचे बंधारे, 44 दगडी साठवण बंधारे, 27 मातीचे बंधाऱ्यांची निमिर्ती व दुरूस्ती, त्यापासुन शाश्वत 2 टी. एम. सी. पाणी साठा वाढवुन लाभक्षेत्रातील शेतक-यांना 5 हजार हेक्टर्स शेती सिंचनासाठी लाभ.
7. गोदावरी नदीवर राज्यात सर्वप्रथम हिंगणी येथे 65 लाख 66 हजार रूपये खर्च करून 20.10.1988 रोजी हिंगणी कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडवुन हिंगणी, मुर्शतपुर, धारणगांव, कुंभारी व सोनारी गावातील 725 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली.
8. 1995 मध्ये गोदावरी नदीवर मंजूर येथे 1 कोटी 59 लाख रूपये खर्च करून कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडवुन मंजुर, चासनळी, धामोरी, मोरवीस व मायगांवदेवी शिवारातील 826 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली.
9. 1996 मध्ये गोदावरी नदीवर (संजीवनी 40 टक्के, कोसाका 40 टक्के व गणेश 20 टक्के संयुक्त) सडे येथे 3 कोटी 20 लाख रूपये खर्च करून कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधुन त्याद्वारे पाणी अडवुन सडे, संवत्सर, कोकमठाण, सावळीविहीर, कोपरगाव भागातील 1865 हेक्टर जमीन ओलिताखाली आणली. याशिवाय संजीवनी कारखान्यांचे कार्यक्षेत्रात असंख्य पाझर तलाव, दगडी साठवण बंधारे, गांवतळे, शेततळी बांधुन पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम हाती घेवुन पुर्ण.
10. दिनांक 12.06.1974-कोपरगांव येथे पिपल्स् बँकेशेजारील मैदानावर महाराष्ट्रातील गड कोट किल्ल्यांची माहिती छायाचित्र प्रदर्शन भरविले ते महिनाभर चालले. या प्रदर्शनांस महाराष्ट्र राज्यातील 4 लाख इतिहास प्रेमींनी त्यावेळी भेट दिली होती.
11. सन 1974.75-जिनीव्हा येथे महाराष्ट्र राज्य साखर निर्यात महामंडळाचा अध्यक्ष म्हणुन उपस्थिती याप्रसंगी झालेल्या करारात भारत देशाला साखर निर्यातीतुन 450 कोटी रूपये मिळवुन दिले.
12. दिनांक 1-05-1979 ते 30.05.1979-कोपरगांव तालुक्यातील जवळके येथे
परिसरातील 15 ते 20 गावातील कुपोषीत मुलां मुलींसाठी लापशी बनवुन ती वाटपाचा कार्यक्रम केला. याप्रसंगी शिक्षण खात्याचे सचिव श्री. कांबळे यांनी भेट देवुन त्याची पाहणी केली. 1200 पोती गहु जमा केला 10 डबे तुपाचे जमा केले होते.
13. सन 1980-भारतीय रिझर्व्ह बँक मुंबई येथे शेतक-यांच्या कर्जाला व्याजाचा दर कमी व्हावा या मागणीसाठी रूम्हणं मोर्चा नेला. त्यातुन देशभरातील शेतक-यांच्या एकुण कर्जावर अर्धा टक्का व्याज दर कमी झाले. - 14. स्थापन केलेल्या शिक्षण संस्था- संजिवनी इंग्लिश मिडीयम स्कुल सहजानंदनगर (1978), संजीवनी एज्युकेशन सोसायटी सहजानंदनगर (1982), के. बी. पी. पॉलेटेक्नीक कॉलेज सहजानंदनगर (1982), संजीवनी इंजिनियरींग कॉलेज सहजानंदनगर (1983), संजीवनी प्रि कॅडेट ट्रेनिंग सेंटर व संजीवनी मोटार ड्रायव्हींग स्कुल सहजानंदनगर (15.9.1992), एकलव्य आदिवासी आश्रमशाळा टाकळी (2000), संजीवनी सैनिकी स्कुल सहजानंदनगर (2000), कॉलेज ऑफ फार्मास्क्युटीकल एज्युकेशन अँड रिसर्च सहजानंदनगर (बी.फार्मसी-2003), संजीवनी इन्स्टीटयुट ऑफ फार्मसी अँड रिसर्च सहजानंदनगर (2003) साईबाबा कॉलेज ऑफ एज्युकेशन सहजानंदनगर (बी.एड. आणि डी. एड. कॉलेज-2004), संजीवनी इंटरनॅशनल स्कुल खारघर मुंबई (2005), संजीवनी आर्टस, कॉमर्स, सायन्स सिनीयर कॉलेज सहजानंदनगर (2012), संजीवनी अकॅडमी सहजानंदनगर (सी.बी.एस्सी पॅटर्न 2012), मास्टर ऑफ बिझनेस ऍ़डमिनीस्ट्रेशन स्कुल सहजानंदनगर (एम.बी.ए-2013), संजीवनी ज्युनियर कॉलेज सहजानंदनगर (2014), संजीवनी आर्टस, कॉमर्स, सायन्स ज्युनियर कॉलेज वैजापुर (2017).
- पुरस्कार
आर्यभूषण :- महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय, पुणे या संस्थेचे संस्थापक स्व.नरूभाऊ लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सहकार, कृषी, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणां-या व्यक्तीला दरवर्षी दिला जाणांरा आर्यभूषण पुरस्कार 6 जुन 2003 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. ना. सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते मिळाला.
सहकार रत्न :- सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावरील इंडियन फार्मर्स फटिर्लायझर को-ऑप.लि., नवी दिल्ली (इफको) या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय स्तरावर दरवर्षी दिला जाणांरा सहकार रत्न पुरस्कार आंतरराष्ट्रीय तांत्रिक संस्थेचे अध्यक्ष