(शिर्डी) अहमदनगर - श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्तीत परिसरात गेल्या 5 डिसेंबर रोजी धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याने सात नागरिकांसह एका वनरक्षकाला जखमी केले होते. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर (Forest Ranger Lakshman Ganpat Kinkar) यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने किनकर कुटुंबियांनावर दुःखाचा डोंगर कोसळलाय (Injured Forest Ranger Dies during Treatment At Shirdi).
श्रीरामपुर शहरातील मोरगे वस्ती परिसरात बिबट्या काही तासापासुन धुमाकूळ घालत असल्याचे समजल्यावर संगमनेर (Sangamner) आणि राहुरी (Rahuri) येथील वनविभागाचे वनरक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी श्रीरामपुर शहरात दाखल झाले होते. परिसरातील एका घराच्या बाथरूममध्ये बिबट्या लपून बसला असल्याची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बिबट्याला पकडण्यासाठी येथे पोहोचले. त्यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
यादरम्यान, राहुरी वनविभागातील वनरक्षक लक्ष्मण गणपत किनकर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करत असतांना, त्यांचा मांडीला बिबट्याने चावा घेतला होता. काही तासांचा प्रयत्ननंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. तसेच जखमी झालेले किनकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पाच डिसेंबरपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान लक्ष्मण गणपत किनकर यांचा मृत्यू झाला आहे. किनकर हे मुळ राहुरी तालुक्यातील ताहाराबाद (Taharabad) येथील रहिवासी आहेत. किनकर यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरलीय.