ETV Bharat / state

बेलापूर खुर्द; दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश - capturing-leopard- Belapur Khurd news

वनविभागाने देशमुख - लोखंडे वस्तीनजीक असणार्‍या विहीरीजवळील शिवारात लावला होता. या पिंजर्‍यात बिबट्या अलगद अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला. बेलापूर खुर्द शिवारातील देशमुख - लोखंडे वस्तीवर बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती.

बिबट्या अडकला पिंजऱ्यात
बिबट्या अडकला पिंजऱ्यात
author img

By

Published : Mar 8, 2021, 12:06 PM IST

Updated : Mar 8, 2021, 1:31 PM IST

अहमदनगर- श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदी परिसरात धुडगूस घालणारा बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. महाडिक-देशमुख वस्तीच्या विहिरीजवळ लावण्यात आलेल्या पिंजर्‍यात बिबट्या अडकला आहे.

बेलापूर खुर्द; दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश
बिबट्याच्या हल्ल्यात एक जण जखमीश्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा नदी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरु होता. गेल्या चार दिवसांंपूर्वी बेलापूर खुर्दमधील देशमुख - लोखंडे वस्तीवर संजय भानुदास लोखंडे यांच्यावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात संजय लोखंडे गंभीर जखमी झाले होते. वनविभागाने घटनेचे गांभीर्य ओळखून बिबट्याला पकडण्यासाठी त्याठिकाणी पिंजरा लावला होता. अखेर आज (सोमवार) तीन ते चार दिवसाने बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले आहे.ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडलाबिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. बेलापूर खुर्द शिवारातील देशमुख - लोखंडे वस्तीवर बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमली होती. अनेक दिवसांपासून सातत्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना या परिसरात वाढल्या आहे. उक्कलगाव, बेलापूर, फत्त्याबाद, कुरणपूर, गळनिंब, प्रवरा पट्ट्यातील वाड्या- वस्त्यावर बिबट्याचे हल्ले वाढले होते. यामुळे वनविभागाने या सर्व परिसरात पिंजरे लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती.

Last Updated : Mar 8, 2021, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.