शेवगाव (अहमदनगर) - शेवगाव तालुक्यातील ढोरसडे येथे स्त्री जातीचे नवजात जिवंत अर्भक सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पहाटे जन्मलेले हे अर्भक जिवंत आहे. दररोजच्या प्रमाणे शेतावर कांदे काढण्यासाठी आलेल्या महिलांना दूरुन लहान बाळ रडत असल्याचा आवाज आल्याने त्यांनी जाऊन पाहिले. त्यावेळी उसाच्या शेतामध्ये हे जिवंत अर्भक तेथे आढळून आले, त्यानंतर त्या महिलांनी शेती मालकास ही गोष्ट सांगितली.
मालकांनी याची माहिती डॉक्टर व पोलीस प्रशासनास सांगितल्यानंतर येथे दहिगाव आरोग्य केंद्राचे डॉ. कैलास कानडे व त्यांचा सर्व स्टाफ घेऊन त्यांनी त्या अर्भकास कपड्यामध्ये गुंडाळून पोलीस प्रशासनाने वतीने शेवगाव पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व बीट हवालदार यांनी त्या अर्भकाचा पंचनामा केला. त्यानंतर ते अर्भक डॉक्टरांच्या ताब्यात देण्यासाठी आले आहे.
हेही वाचा - शेतकऱ्याला मदतीचा हात... मुलाच्या जन्मदिनी स्नेहालयात वाटले टनभर टरबूज