ETV Bharat / state

एफआरपी व्याजासह मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन - ahmednagar

साखर कारखान्यांना गाळपाला आलेल्या ऊसापासून तयार केलेल्या साखरेच्या तारणावर ८५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उचलतात. मात्र, ज्याचा ऊस आहे त्याला मात्र एफआरपी पासून वंचित ठेवतात. तसेच आर आर सी नियमानुसार साखर कारखान्यांवर कारवाई अपेक्षित असली तरी त्याची प्रभावी अमलबजावणी होत नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

एफआरपी व्याजासह मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन
author img

By

Published : May 20, 2019, 9:07 PM IST

अहमदनगर - सन २०१८-१९ च्या गळीत हंगामासाठी २ हजार ६०० रुपये एफआरपीचा दर ठरला असला तरी प्रत्यक्षात अनेक साखर कारखान्यांनी २ हजार २०० च्या आसपासच रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर ठेवली आहे. उर्वरित रक्कम व्याजासह मिळावी या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने आज (सोमवारी) अहमदनगर येथे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

एफआरपी व्याजासह मिळण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन

यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर चौधरी यांनी सांगितले की, या कार्यालयांतर्गत २७ साखर कारखाने येत असून एकाही साखर कारखान्याने घोषित झालेली २६०० रुपये रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलेली नाही. कोणी २ हजर, कोणी २१०० तर कोणी २२०० याप्रमाणे रक्कम दिली आहे. गाळपाला ऊस दिल्यानंतर १५ दिवसात एफआरपी न दिल्यास त्यावर १५ टक्के व्याज आकारणीचे साखर नियंत्रण नियमात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता एफआरपीची उर्वरित रक्कम १५ टक्के व्याजासह मिळावी, अशी मागणी असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

या मागणीचे निवेदन साखर सहसंचालक कार्यालयाला देण्यात आले आहे. साखर कारखान्यांना गाळपाला आलेल्या ऊसापासून तयार केलेल्या साखरेच्या तारणावर ८५ टक्के रक्कम कर्ज म्हणून उचलतात. मात्र, ज्याचा ऊस आहे त्याला मात्र एफआरपी पासून वंचित ठेवतात. तसेच आर आर सी नियमानुसार साखर कारखान्यांवर कारवाई अपेक्षित असली तरी त्याची प्रभावी अमलबजावणी होत नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

Intro:अहमदनगर- एफआरपी ची रक्कन व्याजासह मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_sugar frp protest 2019_vij1_7204297

अहमदनगर- एफआरपी ची रक्कन व्याजासह मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन..

अहमदनगर- 2018-19 च्या गळीत हंगामा साठी दोन हजार सहाशे रुपये एफआरपी चा दर ठरला असला तरी प्रत्येक्षात अनेक साखर कारखान्यांनी दोन हजार दोनशे च्या आसपासच रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातावर टेकवली आहे. उर्वरित रक्कम व्याजासह मिळावी या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने आज (सोमवारी) अहमदनगर इथे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी संघाचे जिल्हाध्यक्ष गंगाधर चौधरी यांनी सांगितले की, या कार्यालयांतर्गत 27 साखर कारखाने येत असून एकाही साखर कारखान्याने घोषित झालेली सव्वीसशे रुपये रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा केलेली नाही. कोणी दोन हजर, कोणी एकवीसशे तर कोणी बावीसशे याप्रमाने रक्कम दिली आहे. गाळपाला ऊस दिल्या नंतर पंधरा दिवसात एफआरपी न दिल्यास त्यावर पंधरा टक्के व्याज आकारणीचा साखर नियंत्रण नियमात स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आता एफआरपी ची उर्वरित रक्कम पंधरा टक्के व्याजासह मिळावी अशी मागणी असल्याचे चौधरी यांनी सांगितले. या मागणीचे निवेदन साखर सहसंचालक कार्यालयाला देण्यात आले आहे. साखर कारखान्यांना गाळपाला आलेल्या ऊसा पासून तयार केलेल्या साखरेच्या तारणावर 85 टक्के रक्कम कर्ज म्हणून उचलतात. मात्र ज्याचा ऊस आहे त्याला मात्र एफआरपी पासून वंचित ठेवतात. तसेच आर आर सी नियमानुसार साखर कारखान्यावर कारवाई अपेक्षित असली तरी त्याची प्रभावी अमलबजावणी होत नाही, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- एफआरपी ची रक्कन व्याजासह मिळावी यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.