ETV Bharat / state

रेखा जरे हत्या प्रकरणात मोठा खुलासा; एका वरिष्ठ पत्रकारानेच दिली होती सुपारी

author img

By

Published : Dec 3, 2020, 7:52 PM IST

तेजस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणात अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

रेखा
रेखा

अहमदनगर - तेजस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी अहमदनगरमधील वरिष्ठ पत्रकार बाळासाहेब बोठे यांचे नाव समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रेखा जरे हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत पाच आरोपींना अटक केली असून त्यांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर सुत्रधाराच्या मागावर पोलीस असून त्याने हत्या का केली, याचा शोध घेत आहेत.

तेजस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्या प्रकरण

पारनेर तालुक्यातील जतेगाव येथील घाटात 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. धारदार शस्त्राने वार करून रेखा जरे यांची हत्या करण्यात आली. रेखा जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखा आणि सुपा पोलिसांकडून तपास सुरू होता. हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली.

आरोपींकडून पोलिसांनी सहा लाख रुपये जप्त केले आहेत. जेष्ठ पत्रकार बाळ बोठे याने हत्येची सुपारी दिल्याचे, आरोपींनी सांगितले. आरोपी बोठे हा एका राज्यस्तरीय आघाडीच्या वृत्तपत्रात निवासी संपादक असल्याने जिल्ह्यातील माध्यम क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.