अहमदनगर : शेती करताना येणाऱ्या अनेक अडचणी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारा खर्च संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मुले पाहत होती. बेड तयार करने, त्यावर मल्चिंग पेपर अंथरणे, ड्रिपची नळी टाकने आणि रोप लावने ही कामे करतांना अनेक अडचणी येतात. तसेच वेळ जास्त लागणे, आणि पैसाही जास्त खर्च होतो. या सगळ्या गोष्टी लक्षात घेवुन कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या 25 विद्यार्थी, विद्यार्थिनी यांच्या टीमने स्वयंचलित बहू रोप पेरणी यंत्र तयार केले आहे.
फोरर इन वन यंत्र : संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या, तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या शेतकरी कुटुंबातील 25 विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टरला जोडून सर्व कामे एकाच वेळी कशी करता येईल, असा विचार करुन एकाच वेळी टोमॅटो, मिरची, वांगी यासह विविध रोपांसाठी दोन सऱ्या पाडून त्या सऱ्यांच्या मधील भरवशावर रोपाची लागवड करता येणार आहे. याचबरोबर रोपाभोवती मल्चींगपेपर अंथरता येणार आहे. रोपाच्या शेजारून ठिबक सिंचनाची नळीही पसरवीता येणार आहे, असे स्वयंचलित बहू रोप पेरणी यंत्र तयार केले आहे.
यंत्र बनवण्यासाठी लागले सात महिने : हे यंत्र बनविण्यासाठी गेली सात महीने या मुलांनी मेहनत केली. केवळ 65 हजार रुपयांत हे फोरर इन वन यंत्र बनवले आहे. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन सर्व्हे करून हे यंत्र तयार केले आहे. माझे आई वडील शेतकरी असून आमची 25 एकर शेती करताना मजूर मिळत नव्हते. त्यामुळे आज यंत्र बनविल्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरणार आहे. यात वेळेसह पैशाचीही बचत होणार असल्याचे यंत्र बनवणारे विद्यार्थी म्हणाले आहे.
हा प्रकल्प करताना विद्यार्थ्यांनी स्वतः कष्ट घेतले आहे. प्रॅक्टिकल आणि थेरोटीकल याचा मेळ म्हणजे हा प्रकल्प आहे. - संजीवनी समूहाचे संचालक नितीन कोल्हे
शेवटच्या फेरीत संजीवनीला यश : देशातील अभियांत्रिकी महाविद्यालये आणि कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शेतीपूरक तयार केलेल्या प्रकल्पांची स्पर्धा नुकतीच सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स (एसई) या जागतिक संस्थेच्या भारतातील एक्सपर्ट इंडिया संस्थेमार्फत राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात घेण्यात आली. यात देशभरातील 28 संघ अंतिम फेरीत आले होते. त्यात शेवटच्या फेरीत 15 संघात झालेल्या स्पर्धेत संजीवनीला यश मिळाले आहे.
यंत्राचे शेतकरी वर्गाकडून कौतूक : ग्रामिण भागात इंजीनियरिंग कॉलेज निघाले, यामुळे मुलांना शिक्षण घेणे सोपे झाले. त्याच बरोबरीने शेतीत येणाऱ्या अडचणी ही मुले रोज बघत होती. त्यातुनच त्यांनी हे बहुउपयोगी यंत्र बनवत एक नवा आदर्श निर्माण करुन दिला आहे. या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या यंत्राचे शेतकरी वर्गाकडून कौतूक होत आहे. यात मुलांबरोबरच मुलींचा देखिल मोठा सहभाग आहे.
हेही वाचा :
- Barti Students Fellowship: बार्टीच्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप; विद्यार्थ्यांच्या ५२ दिवसांच्या आंदोलनाला यश
- New 4 MBBS College : राज्यात होणार नवीन चार एमबीबीएस महाविद्यालये; विद्यार्थ्यांच्या वाढणार 400 जागा
- Budget 2023 : देशातील 100 अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू होणार 5 जी लॅब-निर्मला सीतारामन