ETV Bharat / state

अण्णा आणि पोपटरावांच्या गावात निवडणुकांचा बार

author img

By

Published : Jan 5, 2021, 4:28 PM IST

Updated : Jan 5, 2021, 11:26 PM IST

राळेगणसिद्धीमध्ये गेली पंचवार्षिक अगोदर 35 वर्षे तर हिवरेबाजारला तर तब्बल 30 वर्षात ग्रामपंचायतीची निवडणूक झालीच नाही, मात्र यंदा रथी-महार्थींनी प्रयत्न करूनही गावातील दुसरा, तिसरा गट जागृत झाला आणि या दोन्हीही आदर्शगावात निवडणुकांचा बार उडाला.

ahmednagar
ahmednagar

अहमदनगर - राज्यात ग्रामविकासात आघाडीवर असलेली अहमदनगर जिल्ह्यातील दोन नावे म्हणजे अण्णा हजारे आणि पोपटराव पवार. अण्णा आणि पवारांच्या ग्रामविकासाच्या प्रभावात राळेगणसिद्धी आणि हिवरेबाजार या दोन्ही गावांत अनेकदा बिनविरोध निवडणुका पार पडल्या. राळेगणसिद्धीमध्ये गेली पंचवार्षिक अगोदर 35 वर्षे तर हिवरेबाजारला तर तब्बल 30 वर्षात ग्रामपंचायतीची निवडणूक झालीच नाही, मात्र यंदा रथी-महार्थींनी प्रयत्न करूनही गावातील दुसरा, तिसरा गट जागृत झाला आणि या दोन्हीही आदर्शगावात निवडणुकांचा बार उडालाच.

अण्णा आणि पोपटरावांच्या गावात निवडणुकांचा बार

आ. लंके यांच्या प्रयत्नांना आदर्शगावांची खीळ

पारनेर विधानसभा मतदारसंघात राळेगणसिद्धी (ता. पारनेर) आणि हिवरेबाजार(ता. नगर) ही दोन्ही आदर्शगावे येतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी राज्यात बहुधा सर्वप्रथम बिनविरोध ग्रामपंचायत करा आणि २५ लाख आमदार निधीचा लाभ घ्या, अशी घोषणा केली. या अभियानाचे महत्त्व त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांना पटवून दिले आणि अण्णांनीसुद्धा गावातील प्रमुख लाभेश औटी आणि जयसिंग मापारी हे दोन्ही गट एकत्र बोलवून आ. लंकेच्या उपस्थितीत राळेगणसिद्धीची निवडणूक बिनविरोध होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले, एवढेच नव्हे तर आपण गावात सर्वगट एकत्र येत तंटामुक्त निवडणूक होणार असेल तर आपण या अभियानाचे 'प्रमोशन'करू असेही जाहीर केले. मात्र झाले उलटेच, राळेगणसिद्धीमधील तिसरा गट पुढे आला आणि त्या गटाने निवडणुका लढवण्याची तयारी करताच सर्व गटांनी निवडणुकीत उडी मारली आणि अण्णांच्या राळेगणसिद्धीमध्ये लोकशाही मार्गाने मतदान घेऊन निवडणूक पार पडणार असल्याचे पक्के झाले. अण्णांनी जर कुणाची इच्छा असेल तर लोकशाही मार्गाने निवडणूक झाली पाहिजे, असे आज (बुधवारी) जाहीर करत निवडणुकीचे स्वागत केले.

हिवरेबाजारला ३० वर्षानंतर निवडणुका

राळेगणसिद्धीमध्ये तरी मधल्या काळात निवडणुका झाल्या, मात्र आदर्श ग्राम असलेल्या आणि राज्याच्या ग्रामविकास समितीचे कार्याध्यक्ष असलेल्या आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजारला पण अनपेक्षित झाले. सात सदस्यांचा बिनविरोध पॅनल पोपटरावांनी तयार केलेला असताना गावातील एका गटाने थेट तहसील गाठून आपल्या परिवर्तन पॅनेलच्या उमेदवारांचे अर्ज भरले आणि अखेर हिवरेबाजारला ३० वर्षानंतर निवडणूक लागली. यावर पोपटराव पवारांनी संयमित प्रतिक्रिया देत लोकशाहीमध्ये निवडणूक ही अपेक्षित असेल तर ती झाली पाहिजे, शेवटी गावाचा विकास हा होतच राहील त्यासाठी माझे नेहेमी प्रयत्न असतील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Last Updated : Jan 5, 2021, 11:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.