ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने मेंढपाळाची घोडी दगावली

महावितरणचे दुर्लक्ष झाल्यामुळे एका मेंढपाळाची घोडी विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने मरण पावल्याची घटना घडली आहे.परिसरातील लोकांच्या मनात भितीयुक्त वातावरण तयार झाले आहे.

horse
author img

By

Published : Jul 6, 2019, 6:05 PM IST

अहमदनगर - राहता तालुक्यातील पंधरा चारी शिवारात दत्तु मुरलीधर डापसे या मेंढपाळाची घोडी विजेच्या तारेच्या संपर्कात आल्याने मरण पावली. ही घटना 4 जुलैला घडली.

bites from rahta
घोडी मरण पावल्याने या मेंढपाळाचे जवळपास सत्तर हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मेढपाळ असणारे डापसे कुटुंब हे मुळचे संगमनेर तालुक्यातील मेंढवान या गावचे रहिवाशी आहेत. मात्र उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब गावोगावी भटकंती करत असते. दोनच दिवसांपूर्वी ते राहता तालुक्यातील पंधरा चारी आणि एकरुखे शिव परिसरात वास्तव्यासाठी थांबले होते. या कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली घोडी विजेच्या तारेला स्पर्श लागून दगावल्याने डापसे कुटुंबाची मोठी हानी झाली आहे. प्रशासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी आशा या कुटुंबाला आहे.

ज्या ठिकाणी ही घटना घडली, त्या परिसरात दहा ते बारा कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. या परिसरातून गेलेल्या विजवाहक तारा गेल्या दिड वर्षांपासून अक्षरशः जमीनीवर लोंबकळत आहेत. महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱयांचे दुर्लक्ष झाल्यामुळे ही घटना घडल्याचे स्थानिक रहिवाशीयांचे म्हणणे आहे. तसेच आज या तारांना चिकटून घोडी मरण पावली. भविष्यात या तारांच्या संपर्कात येवून मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक रहिवाशीयांनी उपस्थित केला आहे. महावितरणने ताबडतोब या लोंबकळणाऱ्या विद्युत तारांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील स्थानिकांनी केलेली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR_राहाता तालुक्यातील पंधरा चारी शिवारात 4 जुलै रोजी दत्तु मुरलीधर डापसे या मेंढपाळाची घोडी विजेच्या तारेला टिकटून मरण पावल्याची घटना घडलीये....

VO_ घोडी मरण पावल्याने या मेंढपाळाच जवळपास सत्तर हजार रुपयांच नुकसान झालय. मेढपाळ असणारे डापसे कुटुंब हे मुळचे संगमनेर तालुक्यातील मेंढवान या गावचे रहिवाशी आहे. मात्र उदरनिर्वाहासाठी हे कुटुंब गावोगावी भटकंती करत असते. दोनच दिवसांपूर्वी ते राहाता तालुक्यातील पंधरा चारी आणि एकरुखे शिव परिसरात वास्तव्यासाठी थांबले होते. या कुटुंबांचे उदरनिर्वाहाचे साधन असलेली घोडी विजेच्या तारेला टिकटून मरण पावल्याने डापसे कुटुंबाची मोठी हानी झालीये. प्रशासनाकडून काहीतरी मदत मिळावी अशी आशा या कुटुंबाला आहे....

BITE_ दत्तु डापसे, मेंढपाळ_ महिला

VO_ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे, त्या परिसरात दहा ते बारा कुटुंब कायमस्वरुपी वास्तव्यास आहेत. या परिसरातून गेलेल्या विजवाहक तारा गेल्या दिड वर्षांपासून अक्षरशः जमीनीवर लोंबकळत आहेत. महावितरणच्या दुर्लक्षामुळे हि घटना घडल्याच स्थानिक रहिवाशांचं म्हणनं आहे. तसेच आज या तारांना चिकटून घोडी मरण पावलीये. भविष्यात या तारांच्या संपर्कात येवून मनुष्यहानी झाली तर याला जबाबदार कोण..?
असा प्रश्न स्थानिक रहिवाशांनी उपस्थित करत, महावितरणने ताबडतोब या लोंबकळणार्या विद्युत तारांचा बंदोबस्त करावा.. अशी मागणीही स्थानिकांनी केलीये....

BITE_ स्थानिक रहीवाशी ( भगवा शर्ट )Body:MH_AHM_Shirdi_Vij distraction_Problm_05_Visulas_Bite_10010Conclusion:MH_AHM_Shirdi_Vij distraction_Problm_05_Visulas_Bite_10010
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.