ETV Bharat / state

नगरमधून अखेर विखेंचाच सु'जय' तर पवार-थोरातांचा 'संग्राम' पराभूत - radhakrushana vikhe

डॉ. सुजय यांनी तब्बल 2 लाख 81 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने पवार-विखे राजकीय संघर्षात बळीचा बकरा ठरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी मोदी लाट आणि धनशक्ती ही पराभवाची कारणे सांगत डॉ. सुजय यांना शुभेच्छा दिल्या.

अहमदनगर- विखें परिवाराचा सु'जय' तर पवार-थोरातांचा पराभूत रण'संग्राम'..
author img

By

Published : May 24, 2019, 10:18 PM IST

अहमदनगर - शरद पवार जिथे लक्ष घालतात आणि जे ठरवतात ते करूनच दाखवतात हे आता राजकारणातले समीकरण यावेळी मात्र जमू शकलेले नाही. लोकसभेच्या निकालानंतर अहमदनगर, मावळ आणि माढा या सह अनेक ठिकाणी हे समोर आले आहे. अहमदनगरमधेही पवार-बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंच्या विरोधात शड्डू ठोकला होता, मात्र, 1991 ची पुनरावृत्ती काही झालीच नाही आणि राधाकृष्ण विखेंच्या पुढे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

आमचे प्रतिनिधी राजेंद्र त्रिमुखे यांनी घेतलेला आढावा

लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ज्या काही मोजक्या लढती चर्चेत राहिल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा चर्चेत होती. अगदी सुरुवातीपासून ते निकाल लागेपर्यंत ही जागा चर्चेत राहिली ती सुजय विखे यांच्या उमेदवारीने. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. त्या जागेवर मोठा प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, वडील राधाकृष्ण विखे यांनी त्याला उघडपणे साथ दिली आणि मोठा राजकीय संघर्ष सुरू झाला. निवडणुकीच्या रणधुमाळीनंतर विखेंनी ही जागा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या मताधिक्क्याने जिंकूनही दाखवली.

निकालानंतर डॉ. सुजय विखे यांनी युती सह आपल्या समर्थक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानतानाच ज्यांनी आपल्या विरोधात काम केले त्यांचे येत्या तीन महिन्यात काम तमाम करू असा दमच दिला, तर पवार-थोरात यांच्यावर उपरोधिक टीका करून जशासतसे उत्तर दिले.

डॉ. सुजय यांनी तब्बल 2 लाख 81 हजारांचे मताधिक्य मिळाल्याने पवार-विखे राजकीय संघर्षात बळीचा बकरा ठरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी मोदी लाट आणि धनशक्ती ही पराभवाची कारणे सांगत डॉ. सुजय यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ. सुजय विखे यांच्या अभूतपूर्व विजयाने राधाकृष्ण विखे यांचे भाजपमधील वजन वाढले असून त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विखे विरुद्ध पवार आणि थोरात हा संघर्ष पुढील काळात तीव्र होऊन त्याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसणार असून जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत होण्याची शक्यता अधिक आहे.

Intro:अहमदनगर- विखें परिवाराचा सु'जय' तर पवार-थोरातांचा पराभूत रण'संग्राम'..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_risult sumary 2019_pkg_7204297

अहमदनगर- विखें परिवाराचा सु'जय' तर पवार-थोरातांचा पराभूत रण'संग्राम'..

अहमदनगर- पवार अर्थात शरद पवार साहेब जिथे लक्ष घालतात आणि जे ठरवतात ते करूनच दाखवतात हे आता राजकारणातले समीकरण यावेळी मात्र जमू शकलेले नाही. लोकसभेच्या निकाला नंतरअहमदनगर, मावळ आणि माढा या सह अनेक ठिकाणी हे समोर आले आहे. अहमदनगर मधेही पवार-बाळासाहेब थोरात यांनी सुजय विखेंच्या विरोधात शड्डू ठोकला होता, मात्र 1991 ची पुनरावर्ती काही झालीच नाही आणि राधाकृष्ण विझनच्या8व्यूह नीती पुढे राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागलेय..

व्हीओ1- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात ज्या काही मोजक्या लढती चर्चेत राहिल्या त्यात अहमदनगर दक्षिण लोकसभेची जागा अगदी सुरुवाती पासून ते निकाल लागे पर्यंत चर्चेत राहिली ती सुजय विखे यांच्या उमेदवाररीने. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडे होती. त्या जागेवर मोठा प्रयत्न करूनही उमेदवारी न मिळाल्याने सुजय विखे यांनी भाजपचे कमळ हाती घेतले, वडील राधाकृष्ण विखे यांनी त्याला उघडपणे साथ दिली आणि मोठा राजकीय संघर्ष आणि निवडणुकीच्या रणधुमाळी नंतर विखेंनी ही जागा शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्या नाकावर टिच्चून मोठ्या मताधिक्याने जिंकूनही दाखवली..
बाईट- राधाकृष्ण विखे
व्हीओ 2- निकाला नंतर डॉ सुजय विखे यांनी युती सह आपल्या समर्थक सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानतानाच ज्यांनी आपल्या विरोधात काम केले त्यांचे येत्या तीन महिन्यात काम तमाम करू असा दमच दिलाय, तर पवार-थोरात द्वयीवर खरमरीत उपरोधिक टीका करून जशासतसे उत्तर दिलेय..
बाईट- डॉ सुजय विखे -भाजपचे विजयी उमेदवार
व्हीओ3- डॉ सुजय यांनी तब्बल 2 लाख81 हजाराचे मताधिक्य मिळाल्याने पवार-विखे राजकीय संघर्षात बळीचा बकरा ठरलेले राष्ट्रवादीचे उमेदवार आ.संग्राम जगताप यांनी मोदी लाट आणि धन शक्तीचा ही पराभवाची कारणे सांगत डॉ सुजय यांना शुभेच्छा दिल्यात..
बाईट- आ.संग्राम जगताप (राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार)
व्हीओ 4- डॉ सुजय विखे यांच्या अभूतपूर्व विजयाने राधाकृष्ण विखे यांचे भाजप मधील वजन वाढले असून त्यांचा पक्ष प्रवेश लवकरच अपेक्षित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने विखे विरुद्ध पवार आणि थोरात हा संघर्ष पुढील काळात तीव्र होऊन त्याचे पडसाद येणाऱ्या विधानसभा निवडणुकात दिसणार असून जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत होण्याची शक्यता अधिक आहे..

राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- विखें परिवाराचा सु'जय' तर पवार-थोरातांचा पराभूत रण'संग्राम'..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.