ETV Bharat / state

साई मंदिराच्या तिजोरीत भक्तांकडून 32 कोटींहून अधिकची देणगी - साई भक्त बातमी

टाळेबंदीनंतर मंदिर सुरू झाल्यापासून 25 जानेवारीपर्यंत 71 दिवसांत सुमारे 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. याच काळात साई भक्तांनी 32 कोटी 3 लाख 42 हजार 900 रुपये तर 12 हजार 191 ग्रॅम चांदी व 796 ग्रॅम सोन्याचे दान दिले आहे.

देणगी मोजताना कर्मचारी
देणगी मोजताना कर्मचारी
author img

By

Published : Jan 28, 2021, 7:19 PM IST

Updated : Jan 28, 2021, 7:40 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या टाळेबंदीत मंदिरेही बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे देणगीवरही परिणाम झाला होता. टाळेबंदीनंतर 16 नोव्हेंबरला शिर्डीतील साई मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. त्यामुळे देणगीचा ओघ पुन्हा सुरू झाला आहे. मागील 71 दिवसांत सुमारे 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले. याच काळात साई भक्तांनी 32 कोटी 3 लाख 42 हजार 900 रुपयांचे दानही दिले.

माहिती देताना साई संस्थानचे उपकार्यकरी अधिकारी

71 दिवसांत तब्बल 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी घेतले दर्शन

टाळेबंदीच्या काळातही सुरुवातीचे सहा महिने भक्त ऑनलाइन दर्शन करत साई चरणी दान करत होते. टाळेबंदीनंतर मंदिरे सुरू करण्याची सरकारने परवानगी दिली. त्यानंतर कोरोनाचे नियम पाळत साई भक्त साईबाबांच्या दर्शनाला येऊ लागले. यामुळे 16 नोव्हेंबर ते 25 जानेवारी या कालावधीतील 71 दिवसांत फ्री बायोमेट्रिक दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या 9 लाख 13 हजार 325 असून ऑनलाइन पास काढून 1 लाख 3 हजार 377 भाविकांनी दर्शन घेतले. जनसंपर्क विभागातून 1 लाख 85 हजार 460 भाविकांनी पैसे भरत विशेष दर्शन घेतले, अशाप्रकारे एकूण 12 लाख 2 हजार 162 भाविकांनी साईबाबंचे दर्शन घेतले आहे.

1 कोटी 61 लाख 18 हजार 548 रुपयांची मोफत भोजनासाठी देणगी

16 नोव्हेंबर ते 25 जानेवारीपर्यंत साई संस्थानच्या भोजनालयात तब्बल 4 लाख 41 हजार 949 भाविकांनी मोफत दिल्या जाणाऱ्या प्रसाद भोजनाचा लाभ घेतला आहे. यासाठी 1 कोटी 61 लाख 18 हजार 548 रुपयांची देणगीही भाविकांनी दिली आहे.

71 दिवासंत भाविकांकडून साई मंदिराच्या तिजोरीत जमा झालेले दान

देणगीचे स्वरुपरक्कम
रोख 6 कोटी 18 लाख 70 हजार 361
मनी ऑर्डर50 लाख 71 हजार 979
ऑनलाइन6 कोटी 39 लाख 1 हजार 896
डेबिट किंवा क्रेडीट कार्ड2 कोटी 62 लाख 28 हजार 326
चेक किंवा डीडी3 कोटी 5 लाख 89 हजार 626
परकीय चलन22 लाख 60 हजार 165
दक्षिण पेटीतील देणगी13 कोटी 4 लाख 20 हजार 547
एकूण32 कोटी 3 लाख 42 हजार 900

या व्यतिरिक्त

सोने796 ग्रॅम
चांदी12 हजार 191 ग्रॅम

हेही वाचा - साई मंदिर : गेट नंबर ३ भक्तांसाठी खुले; ग्रामस्थांचा आंदोलनाचा निर्णय मागे

Last Updated : Jan 28, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.