ETV Bharat / state

कोरोना इफेक्ट : शिर्डी साईबाबा मंदिराच्या देणगीत १८२ कोटींची घट!

author img

By

Published : Sep 10, 2020, 6:44 PM IST

७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर भक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे. १७ मार्च ते ३१ ऑगस्‍ट या कालावधीत साईभक्‍तांकडून विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपयांची देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती.

Sai Baba
साईबाबा

अहमदनगर - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्‍य शासनाच्‍यावतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. त्यामुळे १७ मार्चपासून साईबाबांचे समाधी मंदिर भक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले आहे. १७ मार्च ते ३१ ऑगस्‍ट या कालावधीत साईभक्‍तांकडून विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपयांची देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली आहे. मागील वर्षी याच कालावधीत २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती. मागील वर्षाच्‍या तुलनेत १८२ कोटी ६१ लाख १७ हजार ६४४ रुपये इतकी देणगीत घट झाली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

कोरोनामुळे साई संस्थानच्या देणगीत घट

मागील वर्षी दिनांक १७ मार्च २०१९ ते ३१ ऑगस्‍ट २०१९ या कालावधीत दक्षिणा पेटीद्वारे साईभक्‍तांकडून ७५ कोटी २९ लाख ७८ हजार ९२७ रुपये इतकी देणगी संस्‍थानला प्राप्‍त झाली होती. यावर्षी कोरोनाच्‍या संकटामुळे मंदिर बंद आहे. त्यामुळे दक्षिणा पेटीव्‍दारे साईभक्‍तांकडून कोणतीही देणगी प्राप्‍त झालेली नाही.

मागील वर्षी दिनांक १७ मार्च २०१९ ते ३१ ऑगस्‍ट २०१९ या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे १ कोटी ८९ लाख ७९ हजार १६२ रुपये देणगी प्राप्‍त झाली होती. दक्षिणा पेटीद्वारे ७५ कोटी २९ लाख ७८ हजार ९२७ रुपये, रोख देणगी २८ कोटी ६ लाख ४७ हजार ८०५ रुपये, चेक व डीडीद्वारे ११ कोटी ३०लाख २४ हजार ३८३ रुपये, मनीऑर्डरद्वारे ९८ लाख ६१ हजार ४८ रुपये, पर‍कीय चलनाद्वारे २ कोटी५२,६१,७१०.३१/- रुपये, डेबिट/क्रेडीट कार्ड ११,३६,५०,७९१/- रुपये व इतर मार्गाने ७१,९३,६७,९६८.४८/- रुपये अशा विविध प्रकारे २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये व सोने ८८६८.१३० ग्रॅम आणि चांदी १९४४८१.४८० ग्रॅम संस्‍थानला प्राप्‍त झाले होते.

यावर्षी दिनांक १७ मार्च ते ३१ ऑगस्‍ट २०२० या कालावधीत साईभक्‍तांकडून ऑनलाईनव्‍दारे ११ कोटी ४७ लाख ९९ हजार ७९४ रुपये, रोख देणगी १८ लाख ३२ हजार ३९७ रुपये, चेक व डीडीच्या माध्यमातून ९३लाख ५हजार ४११ रुपये, मनीऑर्डरच्या माध्यमातून ६६ लाख २१ हजार ५६ रुपये, पर‍कीय चलनाच्या माध्यमातून १५ लाख ३५ हजार ९६३ रुपये, डेबिट/क्रेडीट कार्डच्या माध्यमातून २ लाख ३६ हजार ९९१ रुपये व इतर मार्गाने ७लाख ३३ २२ हजार ५३८ रुपये असे एकूण २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये संस्‍थानला प्राप्‍त झाले. यातील १२ कोटी रुपये संस्थानातील कर्मचाऱयांच्या वेतनावर खर्च होत असल्‍याचे बगाटे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.