अहमदनगर - संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२८ व्या जयंती आहे. यानिमित्ताने नगरमध्ये नागरिक मोठ्या संख्येने येत असून बाबासाहेबांना अभिवादन करत आहेत.
शहरातील मार्केट चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्याजवळ नागरिकांची मोठी रीघ लागली आहे. आंबेडकरवादी कार्यकर्ते, वेगवेगळ्या सामाजिक राजकीय पक्षांचे नेते, आणि प्रशासनाच्यावतीनेही याठिकाणी डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान ही सर्वात मोठी लोकशाहीची देणगी आहे. या संविधानाचे संरक्षण करणे आणि या संविधानावर देश चालवणे गरजेचे असल्याचे मत यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केले. तर, बाबासाहेब कोणत्याही एका जाती-धर्माचे नाहीत. ते संपूर्ण देशाचे आहेत. आणि त्यामुळेच त्यांच्या विचारांचे सर्व समाजाने अनुकरण केले पाहिजे, अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केल्या.