ETV Bharat / state

आनंदाची बातमी.. भाविकांना आता साईबाबांच्या काकड आणि शेजारतीला जाता येणार - काकड आरती प्रवेश शिर्डी मंदिर

1 मार्च 2022 पासून साईबाबांच्या इतर आरत्‍यांच्‍या नियमांप्रमाणे काकड आरती व शेजारतीकरीता भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

Sai Baba
साई बाबा
author img

By

Published : Feb 28, 2022, 5:28 PM IST

मुंबई - पूर्वीप्रमाणे साईबाबांच्या काकड आरती व शेजारतीच्‍या वेळेत बदल केल्‍यामुळे व शासन आदेशाप्रमाणे रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत जमावबंदी लागू असल्‍याने 1 मार्च 2022 पासून साईबाबांच्या इतर आरत्‍यांच्‍या नियमांप्रमाणे काकड आरती व शेजारतीकरीता भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. ही माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.

हेही वाचा - Prajakt Tanpures sugar factory Seized by ED : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या साखर कारखान्याची मालमत्ता ईडीकडून जप्त- सूत्र

बानायत म्‍हणाल्‍या, गेल्‍या वर्षी जगभरात व देशात आलेल्‍या कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे दोन वेळा राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले होते. त्‍यानंतर जेव्‍हा साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्‍यात आले तेव्‍हा राज्‍य शासनाच्‍या वतीने कोरोना प्रादुर्भावामुळे आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काही मार्गदर्शकतत्‍वे ठरवून दिलेले होते. तसेच वेळोवेळी कोरोना विषाणूच्या संभाव्‍य लाटेच्‍या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी व जमावबंदीचे आदेश जाहीर करण्‍यात आलेले होते. शासनाने दिनांक ०८ जानेवारी २०२२ च्या आदेशाने दिनांक १० जानेवारी २०२२ रोजी पासून संपूर्ण राज्‍यात रात्री ११.०० ते सकाळी ०५.०० वाजेपर्यंत संचारबंदी (नाईट कर्फ्यू) लागू असल्‍यामुळे श्रींची पहाटे ४.३० वाजताची काकड आरती व रात्री १०.३० वाजताची शेजारतीकरीता भाविकांना प्रवेश दिला जात नव्‍हता. परंतु, संस्‍थानच्‍या व्‍यवस्‍थापन मं‍डळाचे अध्‍यक्ष आशुतोष काळे व विश्‍वस्‍त मंडळाच्‍या नुकत्‍याच झालेल्‍या बैठकीत पहाटे ०४.३० वाजता व शेजारती रात्री १०.३० वाजता ऐवजी पूर्वीप्रमाणे सकाळी ०५.१५ वा. व शेजारती रात्री १०.०० वाजता करण्‍याचा निर्णय घेतल्‍यामुळे आता साईभक्‍तांना या दोन्‍ही आरत्‍यांना प्रवेश देणे शक्‍य झाले आहे. तसेच, साईभक्‍त व ग्रामस्‍थांकडूनही अशी मागणी वारंवार करण्‍यात येत होती.

भाविकांच्या काकड आरती व शेजारतीकरीता प्रवेश मिळण्‍याच्या मागणीचा विचार करत संस्‍थानच्‍या वतीने दिनांक ०१ मार्च २०२२ पासून श्रींच्‍या काकड आरती व शेजारती करीता साईभक्‍तांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र, कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍य शासनाच्‍या नियंमाप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन करून भाविकांना प्रवेश दिला जाणार असल्‍यामुळे मर्यादीत संख्‍येने भाविक या आरत्‍यांचा लाभ घेवू शकणार.

पूर्वीच्‍या नियंमाप्रमाणे चारही आरत्‍यांकरीता online.sai.org.in या संस्‍थानच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावरून पास उपलब्‍ध असणार आहे. ऑफलाईन आरतीपासेस उपलब्‍ध राहणार नाही, यांची सर्व भाविकांनी व ग्रामस्‍थांनी नोंद घ्‍यावी, असेही बानायत यांनी सां‍गितले. तसेच, सर्व साईभक्‍तांनी व शिर्डी ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन संस्‍थान व्‍यवस्‍थापन मंडळाचे अध्‍यक्ष, विश्‍वस्‍त व संस्‍थान प्रशासनाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.

हेही वाचा - Nawab Malik in ED Custody : नवाब मलिक कोठडीत असताना अवमानतेची कारवाई कशी करणार? मुंबई उच्च न्यायालयाचा वानखेडेंना प्रश्न

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.