ETV Bharat / state

शिर्डीतील पालखीचा संगमनेर तालुक्यात अपघात; चार जणांचा मृत्यू - Accident Pune Nashik Highway

Shirdi Accident News : अलीकडच्या काळात राज्यासह देशभरातील अपघातांमध्ये वाढ होत आहे. या अपघातात लोकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू होत आहेत. तर संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर (Pune Nashik Highway) भीषण अपघात (Accident in Sangamner taluka) घडला आहे. शिर्डीहून आळंदीला निघालेल्या पालखीत ट्रक घुसून चार जणांचा मृत्यू झाला आहे.

Shirdi Accident News
पालखीचा अपघात
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2023, 8:21 PM IST

Updated : Dec 3, 2023, 8:47 PM IST

शिर्डी Shirdi Accident News : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज यांच्या शिर्डी ते आळंदी पालखीला संगमनेर तालुक्यातील पुणे - नाशिक (Pune Nashik Highway) महामार्गावरील 19 मैल जवळ अपघात झालाय. पालखी संगमनेरच्या दिशेनी आळंदीकडे जात असतांना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात (Accident News) घडलाय. या अपघातात चार जणांचा मृत्यू तर नऊ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींनवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे : शिर्डी येथून आळंदीकडे निघालेल्या दिंडीत कंटेनर घुसल्याने झालेल्या अपघातात, चार जणांचा मृत्यू झाला असून नऊ वारकरी जखमी झाले आहेत. ही अपघाताची घटना नाशिक-पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात रविवारी सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. भाऊसाहेब नाथा जपे (कनकुरी), बाळासाहेब अर्जुन गवळी (मढी बु,ता.कोपरगाव), बबन पाटीलबा थोरे (द्वारकानगर,शिर्डी), ताराबाई गंगाधर गमे (कोऱ्हाळे,ता.राहता) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांची नावे आहेत.

अपघातात तीन वारकर्‍याचा मृत्यू : शिर्डीतील श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर ट्रस्टचे ह.भ.प. काशिकानंद महाराज हे दरवर्षी शिर्डी ते आळंदी श्री साईबाबा पालखी सोहळा गेल्या 36 वर्षांना पासून आयोजित करतात. यंदाच्या 37 वे वर्ष आहे या पालखीत, नाशिक, शिर्डी, अहमदनगर जिल्ह्यात साधरणात 250 ते 300 वारकरी सहभागी झाले होते. ही पालखी गुरुवारी शिर्डीतून आळंदीच्या दिशेने रवाना झाली होती. पालखी संगमनेर तालुक्यातील पुणे- नाशिक महामार्गावरील 19 मैल येथे पोहचली असतांना अचानक भरधाव वेगाने नाशिकच्या दिशेने पुण्याकडे जात असलेला MH12 VT 1455 नंबरचा कंटेनर थेट पालखीत घुसल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच तर दोन वारकर्‍याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचं समजतंय, तर नऊ वारकरी जखमी असून जखमींना संगमनेर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

कंटेनर चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात : ही दुर्दैवी घटना आज रविवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान या अपघाताला कारणीभूत असणारा कंटेनर चालक नशेत असल्याने त्याला डुलकी लागल्याचे समजते. या अपघातातील मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांची ओळख पटली असून कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. दरम्यान आजूबाजूच्या नागरीकांनी तात्काळ मदत करत जखमींना मदत करत दिलासा दिला आहे.

हेही वाचा -

  1. नवी मुंबईत भीषण अपघात; एक ठार, तर दोघं गंभीर जखमी
  2. Buldhana Accident News : अपघातात मरण पावलेल्या भिकाऱ्याकडे सापडले लाखो रुपये; मेहकर मधील श्रीमंत भिकारी
  3. मनमाड-मालेगाव मार्गावर कार-कंटेनरची धडक; दोन सख्ख्या भावांसह पाच जणांचा मृत्यू

शिर्डीतील पालखीचा संगमनेर तालुक्यात अपघात

Last Updated : Dec 3, 2023, 8:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.