ETV Bharat / state

साई दर्शनाने नव वर्षाचे स्वागत; मध्यरात्रीच भाविकांच्या गर्दीने फुलली साईनगरी शिर्डी

साई बाबांचे दर्शन घेऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी शिर्डी मध्ये शेकडो भाविकांनी उपस्थिती लावली आहे. नव वर्षाचे स्वागत करताना भाविकांनी साई नामाच्या जयघोषासह कोरोना मुक्तीचे साकडे बाबांच्या चरणी घातले आहे. यावेळी साई भक्तांनी मंदिर परिसपरात फटाक्यांची आतषबाजीही केली.

sai shirdi
साई दर्शनाने नव वर्षाचे स्वागत;
author img

By

Published : Jan 1, 2021, 7:28 AM IST

Updated : Jan 1, 2021, 8:34 AM IST

शिर्डी - सरत्या वर्षाला निरोप देताना नववर्षांच स्वागत मंगलमय वातावरणात करण्यासाठी लाखो साईभक्तांनी गुरुवारी नव वर्षाच्या पूर्वसंध्येपासूनच साई दरबारात हजेरी लावली. गुरुवारी मध्यरात्री रात्री 12 वाजेच्या सुमारास भाविकांनी साईं मंदिर परिसरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी शेकडो भाविकांनी साईंचे दर्शन घेऊन मोठ्या उत्साहात नव वर्षाचे स्वागत केले.

साई दर्शनाने नव वर्षाचे स्वागत;

शिर्डीत भाविकांची मांदियाळी-

नवीन वर्ष साईंच्या दर्शनाने सुरू करण्यासाठी शिर्डीच्या साईमंदिराच्या दर्शनबारीसह मंदिर परीसरात भाविकांची मांदियाळी दिसून आली. ३१ डिसेंबरच्या रात्री सरत्या वर्षाला निरोप देत बरोबर 12 वाजल्यानंतर नववर्षाची सुरवात साईंच दर्शनाने करण्यासाठी लाखो भाविक शिर्डीत दाखल होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्यात येत होती. भाविकांनी दर्शनबारीत प्रवेश केल्याच प्रकर्षाने जाणवले. तसेच ज्यांना मंदिरात प्रवेश करता आला नाही, त्यांनी साई समाधी मंदिराच्या कळसाच दर्शन घेत धन्यता मानली. मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले ठेवण्यात आल्याने शेकडो भाविकांना रात्रीच साईंचे दर्शन घेता आले.

shirdi
अलिंगन देऊन शुभेच्छा देताना साईभक्त

कोरोनामुक्त वर्षाचे साकडे-

साईनगरीत नवीन वर्षाच स्वागत मोठ्या जल्लोषात करण्यात आले. तासनतास रांगेत उभे राहात भाविकांनी नवीन वर्षात कोरोनाचा नायनाट होवो, असे साकडे साईबाबांना घातले. साईनामाचा जयघोष करत भक्तांनी फटाक्यांची आतषबाजी केली. मिठाई वाटून सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच स्वागत करत भाविकांनी एकमेकांना अलिंगन देत शुभेच्छाही दिल्या.

Last Updated : Jan 1, 2021, 8:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.