ETV Bharat / state

Sai Temple In Shirdi : साईबाबांच्या आरतीला भाविकांना प्रवेश द्या; ग्रामस्थांसह भाविकांची मागणी - Sai Temple In Shirdi

महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत लावण्यात आलेले काही निर्बंध शिथिल केले आहेत. (Sai Temple In Shirdi) मात्र, साईं मंदीरातील काकड आरती आणि शेजारतीला भाविकांना अद्याप प्रवेश दिला जात नसल्याने साईबाबांची गुरुवारची पालखी सुरू आणि आरत्यांनाही भाविकांना प्रवेश देण्याची मागणी होत आहे.

साई मंदिर
साई मंदिर
author img

By

Published : Feb 4, 2022, 1:15 PM IST

अहमदनगर (शिर्डी) - महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत लावण्यात आलेले काही निर्बंध शिथिल केले आहेत. (Sai Temple In Shirdi) मात्र, साईं मंदीरातील काकड आरती आणि शेजारतीला भाविकांना अद्याप प्रवेश दिला जात नसल्याने साईबाबांची गुरुवारची पालखी सुरू आणि आरत्यांनाही भाविकांना प्रवेश देण्याची मागणी होत आहे.

व्हिडिओ

80 टक्के लसीकरण पुर्ण

लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. (Sai devotees demand darshan) राज्य सरकारच्या या आदेशाचा नगर जिल्ह्यात मात्र 80 टक्के लसीकरण झाल्याने 90 टक्यांच लसीकरण झालेल्या जिल्ह्याच्या यादीत नगर जिल्हा बसला नाही. त्यामुळे अद्याप अनेक निर्बंध कायम आहेत. त्यामध्ये कोरोना नियमा अंतर्गत जिल्ह्यात रात्रीची संचारबदी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर साईबाबांच्या मंदीरात पहाटे साडेचार वाजता होणाऱ्या काकड आरतीला आणि रात्री साडे दहा वाजता होणाऱ्या शेजआरतीला भाविंकांना प्रवेश दिला जात नाही.

भाविकांना काकड आरतीला आणि शेजआरतीला प्रवेश देण्याची मागणी

दुसरीकडे राज्यातील अनेक बंधने उठविले गेलेत. शिर्डीच लसीकरणही 90 टक्के झाले असल्याने आणि शिर्डीच अर्थकारण पुर्णपणे साईभक्तांवर अवलंबुून असल्याने शिर्डातील रात्रीचे नियम शिथील करुन भाविकांना काकड आरतीला आणि शेजआरतीला प्रवेश देण्याची मागणी आता होवू लागली आहे.

धार्मिक स्थळांनाच कोरोनाच्या नियमच का?

शिर्डीत साई दर्शनानंतर साईभक्त साईबाबांच्या जीवनावराल थीम पार्कही पहाण्यासाठी जातात. मात्र, शिर्डीतील कोरोना निर्बंध अद्यापही उठवली गेली नसल्याने खाजगी पर्यटन केंद्रही सुरु होवू शकले नाही. त्यामुळे अनेकांचा रोजगारही बुडतोय याच बरोबरीने गेल्या दोन वर्षांपासून साई मंदीरात हार, प्रसाद, फुले नेऊ दिली जात नाहीत. त्यामुळेही शेतकऱ्यांना फुले कमी दरात इतत्र विकाव लागत आहेत. कस बघीतल तर एकीकडे कोरोना नियमांची पायमल्ली आणि दुसरीकडे कोरोनाचे नियम शिथील केले जात असताना धार्मिक स्थळांनाच कोरोनाच्या नियमच का शिथील होत नाहीत असा प्रश्न भाविक उपस्थित करत आहेत.

हेही वाचा - Goa Election : राहुल गांधी आज गोव्याच्या दौऱ्यावर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.