शिर्डी शिर्डी ( Shirdi ) साईबाबांचे निस्सीम भक्त आणि नूतन कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर ( Cabinet Minister Deepak Kesarkar ) यांनी आज शिर्डीत येवुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच ते साई दर्शनाला आले. साई दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केसरकर ( Deepak Kesarkar ) म्हणाले की मंत्री मंडळ स्थापन झाले आहे. नूतन मंत्र्यांच्या हातून महाराष्ट्रातील जनतेची जास्तीत जास्त सेवा घडावी यासाठी आज साई चरणी प्रार्थना केली. तसेच खातेवाटप बाबत विचारणा केली असता कोणतेही खाते मिळो प्रामाणिकपणे आपण काम केले पाहिजे आणि आपल्याला जी जी माहिती आहे. ती आपल्या सहकाऱ्यांना दिली पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील जनतेला त्याचा फायदा जास्तीत जास्त मिळेल अशी अपेक्षा यावेळी दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.
कप्रतिनीधींच्या हस्ते झेंडावंदन स्वातंत्र्यदिनी लोकप्रतिनीधींच्या हस्ते झेंडावंदन होण गरजेचे आहे हे खरं आहे. मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे ज्या त्या जिल्ह्यात झेंडावंदन करू असही केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी नमूद केले. पालकमंत्री असणार का या प्रश्नावर बोलताना केसरकर यांनी मुख्यमंत्री ठरवतील तसं असे केसरकरांनी नमूद केले. दरम्यान शिर्डीतील मंदिराच्या परिसरातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केलं जातील. मुंबईसह राज्यातील धार्मिक स्थळांच्या परिसरात गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी प्रयत्न करु असेही केसरकर यावेळी म्हणाले आहे.
हेही वाचा - Khodashi Dam कराडजवळचे ब्रिटिशकालीन खोडशी धरण ओव्हरफ्लो, पाहा व्हिडिओ