ETV Bharat / state

Deepak Kesarkar On Teachers: शिक्षकांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का.... मंत्री केसरकर

Deepak Kesarkar On Teachers: महाराष्ट्रात चुकीची प्रथा पडायला सुरुवात झालीय. शिक्षकांनी जीआर वाचायला पाहिजे. शिक्षक सरकारी नोकर असताना त्यांनी लाख लाख रुपये पगार घ्यायचा आणि मुलांनी मोडक्या शाळेत बसायचे का? शाळेच्या विकासासाठी निधी देण्यात येतोय. शिक्षकांनी 'जीआर' नीट वाचायला हवा असल्याचं शालेय शिक्षण मंत्री (School Education Minister) दीपक केसरकर (Deepak Kesarkar) आज (शनिवारी) शिर्डीत म्हणाले आहे. (Deepak Kesarkar Shirdi Visit)

Deepak Kesarkar On Teachers
मंत्री केसरकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 21, 2023, 10:22 PM IST

शिक्षकांना देण्यात येणाऱ्या सवलतींविषयी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे मत

शिर्डी (अहमदनगर) Deepak Kesarkar On Teachers: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी यावेळी संवाद साधलाय. शिक्षकांना सगळ्यात जास्त सवलती देण्याचा निर्णय घेणारा मी एकमेव मंत्री आहे. (repair of dilapidated schools) एवढ्या सवलती देऊन सुद्धा शिक्षक आंदोलन करत असतील तर यांची ही भूमिका मला मान्य नाही, असेही यावेळी केसरकर म्हणाले आहे. ( teachers agitation) आज अनेक शिक्षक गावी राहत नसताना देखील भत्ते घेत आहेत. मी यांच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतोय. मी एक गोष्ट जरी वाचविली तर दोन हजार चारशे कोटी रुपये वाचतील आणि या पैशातून राज्यातील सगळ्या शाळा दुरुस्त करू शकतात, अशा शब्दात मंत्री केसरकर यांनी शिक्षकांची शाळा घेतलीय.

अशा शिक्षकांवर कारवाई करणार: शाळा मजबुतीकरणाच्या निर्णयामध्ये एकही शाळा बंद केली जाणार नाही. एकाही शिक्षकाला कमी केले जाणार नाही हा निर्णय जाहीर केला असताना देखील मोर्चे निघत आहेत. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. लोकांना भडकवणारी लोक एका विशिष्ट संघटनेची असल्याचं मला समजले, असे केसरकर म्हणाले आहे. विद्यार्थ्यांना तरी राजकारणापासून लांब ठेवा. त्यांना चांगले शिक्षण घेऊ द्या. चांगले शिक्षण घेणे हा विद्यार्थ्यांचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. तसेच विद्यार्थ्यांना मोर्चाला आणणाऱ्या शिक्षकांवर कारवाई करावीच लागेल, असेही यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसकर म्हणाले आहे.

शाळांच्या दुरुस्तीचा निर्णय टांगळीला: राज्यातील अनेक शाळा मोडकळीस आल्या आहेत. काही शाळांच्या इमारती खचल्या असल्या तरी येथे विद्यार्थी जीव मुठीत धरून शिक्षण घेत आहेत. याची जाणीव शासनाला सुद्धा आहे. मात्र, पैशाअभावी म्हणा किंवा राजकारणाअभावी या शाळांची दुरुती टांगणीवर पडली आहे. यावर आगामी काळात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय निर्णय घेतात, याकडे पालकांचे लक्ष लागून आहे.

निवृत्त शिक्षकांच्या जागी कंत्राटी शिक्षक: मंत्री दीपक केसरकर यांच्या निर्णयावर शिक्षक आमदारांनी नाराजी दर्शविली होती. जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर निवृत्त शिक्षक घेण्याचा निर्णय यापूर्वी जुलै, 2023 मध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला होता. या निर्णयाला राज्यभरातून विरोध होत होता. राज्यात मोठ्या प्रमाणात डीएड, बीएडधारक बेरोजगार असताना निवृत्त शिक्षकांना संधी का दिली जात आहे? शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी निर्णय मागे न घेतल्यास डीएड, बीएड धारकांसह सरकार विरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा, पुणे पदवीधर विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगांवकर यांनी दिला होता.

शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी: कोरोनाच्या संकटानंतर आता बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने तरुणांमध्ये नैराश्य येत आहे. राज्यभरातील डीएड, बीएडधारक अभियोग्यता परीक्षा दिलेले उमेदवार शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये कंत्राटी पद्धतीने निवृत्त शिक्षक भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार डीएड बीएडधारकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. डीएड बीएडचे शिक्षण घेताना विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी पोटाला चिमटा काढून मुलाला शिकवले. मात्र, आता घेतलेल्या शिक्षणाचा उपयोगच होत नसल्याने या विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे, या विरोधात राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा यावेळी देण्यात आला होता.

हेही वाचा:

  1. Uddhav Thackeray : त्यावेळी दाऊद भाजपाध्यक्ष होता का? ललित पाटील प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
  2. Nitesh Rane : दसरा झाल्यावर अटक टाळण्यासाठी आदित्य ठाकरे देश सोडून जाणार; नितेश राणेंचा मोठा गौप्यस्फोट
  3. Ajit Pawar : 'कंत्राटी भरतीनं नोकऱ्या जाणार असल्याचा गैरसमज पसरवला, आता माफी...', अजित पवारांची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.