ETV Bharat / state

पश्चिम बंगालहून सायकल चालवत 'तो' शिर्डीला आला, दहशतवाद मुक्त भारतासाठी साई चरणी घातले साकडे - शामापौदी

नवी कोरी सायकल, डोक्यावर हेल्मेट, सायकलवर तिरंगा आणि समोर शामापौदी शर्मा असे नाव लिहिलेला फलक. ४९ वर्षीय शामापौदी या अवतारात आपले लक्ष वेधून घेतात

शामापौदी शर्मा
author img

By

Published : Mar 10, 2019, 12:56 PM IST

अहमदनगर - पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देश शोकाकुल झाला. यानंतर दहशतवादाचा खात्मा व्हावा, अशी सर्व देशवासियांची प्रतिक्रिया होती. त्यातीलच एक नागरिक दहशतवाद मुक्त भारतासाठी साई बाबांच्या दरबारी दाखल झाला आहे. पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथून सायकल चालवत तो शिर्डीत दाखल झाला आहे.

नवी कोरी सायकल, डोक्यावर हेल्मेट, सायकलवर तिरंगा आणि समोर शामापौदी शर्मा असे नाव लिहिलेला फलक. ४९ वर्षीय शामापौदी या अवतारात आपले लक्ष वेधून घेतात. फलकावरील 'जय हिंद' हा शब्द त्यांच्या या प्रवासाच्या हेतूची किंचित कल्पना देतो. त्यांच्याशी बोलल्यानंतर ते २ हजार ५०० किमीचा प्रवास करून आले आहेत यावर विश्वास बसत नाही.

१४ फेब्रुवारीला पुलवामा हल्ला झाला. त्यानंतर १७ फेब्रुवारीला शामापौदी शर्मा त्यांच्या घरातून प्रवासाला निघाले. दुर्गापूर या आपल्या गावातून निघून महाराष्ट्रातील शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनासाठी जायचे असे त्यांनी ठरवले. तब्बल २० दिवसांचा प्रवास करून ते शिर्डीला पोहोचले आहेत. देशातील दहशतवाद संपवा यासाठी साईबाबांना साकडे घालणार असल्याचे ते सांगतात.

याआधीही शर्मा यांनी काठमांडू, मुंबई, बैगलोर यासह अनेक ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी सायकलवारी केली आहे. शेंगदाणा फुटाण्याचा व्यवसाय करून उदर्निवाह करत असलेला हा देशभक्त इंधनावरील वाहनापेक्षा दोन चाकांच्या सायकलवर प्रवास करणे पसंद करतो.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale

भारत देश आंतकवाद मुक्त व्हावा तसेच पुलवामा दहशतीवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्दांजली आर्पीत करण्यासाठी देशाच्या पुत्राने तब्बल 2500 किलो मिटर सायकल वारी सुरु केलीये.. वेस्ट बंगाल मधील दुर्गापुर येथून पुलवामा हल्ल्या नंतर हा 50 वर्षीय देशभक्त सायकल घेवून चक्क सबका मालिक एक च्या दरबारी निघाला..17 फेब्रुवारी रोजी मनाशी निश्चय करुन भारत माता की जय आणि पाकिस्थान मुर्दाबाद संकल्प मनाशी घट्ट करुन शामपोदौ शर्मा हे आज 20 दिवसानंतर पंचवीशे किमीचा सायकल प्रवास करुन ते साईनगरीत पोहचले....

साईंच्या नगरीत पोहचण्याची ओढ आणि देशा बद्दल असलेली भक्तीमुळे ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता शामापादौनी शिर्डीत प्रवेश केलाय..नविन कोरी दानात मिळालेली सायकल, डोक्यात हेलमेट, सायकला देशाचा तिरंगा, आणि जयहिंद चा फलक बरचं काही सागून जात होता..देशभक्तीचा जजबा मानशी घट्ट करुन हा देशभक्त देशातून आंतकवाद नाहीसा व्हावा तसेच पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्दांजलीसाठी साई दरबारी पोहचल्याचे सांगतोय....

भारत माता की जय चा नारा देत पुलवामा हल्ल्याचा रोष व्यक्त करत पश्चिम बंगाल मधील हा देश भक्त साईनगरीत पोहचला आहे..याआधी त्यांनी काठमांडू, मुंबई, बैगलोर, सह अनेक ठिकाणी व्यसनमुक्तीसाठी सायकल वारी केलीये...शेंगदाना फुटाण्याचा व्यवसाय करुन उदर्निवाह करत असलेला हा देशभक्त इंधनाच्या वाहना पेक्षा दोन पैय्याच्या या सायकलवर जास्त भरोसा देतोय....Body:10 March Shirdi Cycle Yatra Conclusion:10 March Shirdi Cycle Yatra
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.