अहमदनगर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ शेवगावमध्ये निदर्शने करण्यात आली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष, महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती, जनआंदोलनाची संघर्ष समितीने यात सहभाग नोंदविला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनास २६ जुलै रोजी ८ महीने होत आहेत. तरीही केंद्रातील मोदी सरकारकडून आंदोलनाकडे दूर्लक्ष केले जात असल्याचा आरोप करत केंद्र सरकारचा निषेध यावेळी करण्यात आला. याशिवाय शेतकरीविरोधी कायदे रद्द करा, शेतमालाला हमीभाव द्या, विजबील विधेयक-२०२० मागे घ्या, शेतकऱ्यांना युरियाचा मुबलक प्रमाणात पुरवठा करा अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या.
हेही वाचा - VIDEO : चिमुकलीच्या वेटलिफ्टिंगची देशवासियांना भूरळ; मीराबाई चानूची देखील क्यूट प्रतिक्रिया