ETV Bharat / state

कोरोनाचा साईंच्या देणगीवर परिणाम; तब्बल 262 कोटी रूपयांचे दान कमी - कोरोनाचा साईंच्या देंणगीवर परिणाम

साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशलिटी रूग्णालय आणी साईनाथ सामान्य रूग्णालय तसेच कोविड सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचाराबरोबरच 640 बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात 140 ऑक्शीजन बेड आणी 20 व्हेंटीलेटर्सचा समावेश आहे

Sai mandir
Sai mandir
author img

By

Published : May 30, 2021, 10:31 AM IST

Updated : May 30, 2021, 11:01 AM IST

शिर्डी(अहमदनगर)-कोरोनाच्या पुर्वी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत वर्षाकाठी देशविदेशातून 1 कोटी 70 लाख भाविक शिर्डीत येत असल्याने साईंची झोळीतही वर्षाकाठी तब्बल 380 कोटीच्या आसपास दान भाविकांकडून मिळत होते. मात्र कोरोनाच्या काळात साईमंदीर भाविकांना दर्शनासाठी बंद झाल्यानंतर साईंच्या झोळीत वर्षभरात 94 कोटीचे दान प्राप्त झाले आहे. भाविकांसाठी साईमंदीरात दर्शन बंद झाल्याने वर्षाकाठी 262 कोटी रूपयांचे दान कमी झाले असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे.

कोरोनाचा साईंच्या देंणगीवर परिणाम
कोरोना संकटात शिर्डीतील व्यावसायिक आर्थिक संकटातकोरोनापूर्वी भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून जात होती. व्यावसायिकांनाही सुगीचे दिवस होते. मात्र, गेल्या दिड वर्षापासून कोरोनामुळे शिर्डीत भाविक नसल्याने शिर्डी शहरातील लहान मोठ्या व्यावसायिकापासून हॉटेल उद्योग मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. केंद्र व राज्य सरकारने शिर्डीतील हॉटेल व्यावसायाला उद्योगाचा दर्जा देवून उद्योगांप्रमाणे सवलती देण्याची मागणी ज़ोर धरू लागली आहे. 362 कोटीचे दान जमा कोरोनापूर्वी 1 जानेवारीला 3018 ते 31 डिसेंबर 2018 या वर्षात 1 कोटी 65 लाख 86 हज़ार 22 भाविकांनी साईंचे दर्शन घेत या वर्षात 379 कोटीचे दान जमा झाले होते. 1 जानेवारी 2019 ते 31 जानेवारी 2019 या वर्षात 1 कोटी 57 लाख 37 हज़ार 566 भाविकांनी दर्शन घेतले. या वर्षात 362 कोटीचे दान जमा झाले. कोरोनाच्या संकट काळात साईमंदीर भाविकांसाठी बंद झाल्यावर 1 एप्रिल 2020 ते 26 मे 2021 पर्यंत भाविकांनी ऑनलाइन 94 कोटी देणगी साईंच्या तिजोरीत जमा केली.रूग्णांसाठी आदर्शवत आरोग्य मॉडेलकोरोनाच्या संकटात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साईबाबा समाधी मंदीर भाविकांसाठी बंद आहे. तरी साईच्या खजिन्यातून रुग्णांसाठी अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्द करून साई सेवेचा मंत्र जोपासला जात आहे. साईसंस्थानच्या रूग्णालयात आणि कोविड सेंटरमध्ये एका वर्षात तब्बल 7000 कोरोना रूग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान मिळाले आहे. साईबाबा संस्थानकडून रूग्णालयांसाठी 2021-22 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 203 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांच्या प्रयत्नातून उद्योगपती अंबानी आणी साईभक्त के. व्ही रमनी यांच्या दानातून 3 कोटी रूपये खर्च करून निर्माण केलेल्या ऑक्शीजन प्लॅन्ट आणी अत्याधुनिक आरटीपीसीआर लॅबमुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नांती पराकाष्ठा करत देशातील क्रमांक दोनचे देवस्थान असलेले साईबाबा संस्थान शिर्डी हेही सरसावले असून साईबाबांनी दिलेला आरोग्य सेवेचा मंत्र जोपासत आहे. साईसंस्थानच्या पुढाकारातून ऑक्शीजन प्लँन्टची निर्मिती झाल्यावर रूग्णांना प्राणवायू देण्याचे काम साईसंस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे करत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणी उप-मुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्याबाबत बगाटे यांचे कौतुकही केले आहे. साईसंस्थान माध्यायमातून कोरोना रूग्णांसाठी आदर्शवत आरोग्य मॉडेल ठरले आहे.


अत्याधुनिक लॅब
साईबाबा संस्थानच्या साईबाबा सुपर स्पेशलिटी रूग्णालय आणी साईनाथ सामान्य रूग्णालय तसेच कोविड सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक उपचाराबरोबरच 640 बेड कोरोना रूग्णांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. यात 140 ऑक्शीजन बेड आणी 20 व्हेंटीलेटर्सचा समावेश आहे. वर्षभरात सुमारे 7000 रुग्णांवर मोफत उपचार करून कोरोनातून त्यांना जीवनदान देण्याचे काम साईंच्या या आरोग्य मंदीरातून झाले. रूग्णांबरोबरच रूग्णांच्या नातेवाईकांनाही मोफत जेवण आणि निवास व्यवस्था साईसंस्थानने करून मानुसकीचे दर्शन घडवले आहे. साईबाबांनी आयुष्यभर भक्तांच्या आरोग्याची काळजी घेतली. साईबाबांच्या या आरोग्य सेवेचा वारसा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून पुढे चालवला जात आहे. कोरोनाच्या संकटात गोरगरीब रूग्णांना अत्याधुनिक उपचार मिळावेत यासाठी साईबाबा सुपर रूग्णालय आणी कोविड सेंटरमध्ये अत्याधुनिक उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रूग्णांना प्राणवायुची कमतरता भासू नये यासाठी अंबानी आणि रमनी यांच्या तीन कोटी रूपयांचा दानातून तातडीने एका मिनिटाला 1200 एसपीएमआरएफ लिटर निर्माण होणारा ऑक्सिजन प्लॅन्ट उभारला गेला आहे. कोरोना रूग्णांना आठ तासात कोरोना रिपोर्टचा अहवाल मिळण्यासाठी अत्याधुनिक लॅबही रूग्णसेवेत दाखल करण्यात आली आहे. रूग्णसेवेत साईसंस्थान आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

Last Updated : May 30, 2021, 11:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.