अहमदनगर- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा एक हजाराच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला आहे. रविवारी जिल्ह्यात 6 रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या 963 इतकी झाली आहे.
रविवारी सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये नगर शहरातील सर्जेपुरा भागातील तीन, पाईप लाईन रोड येथील एक, नगर ग्रामीण येथील एक, आणि पाथर्डी शहरात एक असे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 307 इतकी झाली आहे तर एकूण रुग्णांची संख्या 963 इतकी झाली आहे.
रविवार ठरला दिलासादायक-
जिल्ह्यात रविवारी 66 रुग्ण कोरोना वर मात करून घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 634 इतकी झाली आहे. तसेच रविवारी 193 व्यक्तींचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. रुग्ण संख्या वाढत असताना आता आरोग्य प्रशासनाने अजून सतर्कता बाळगत परिस्थिती हाताळण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्टमध्ये 27 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. 27 रुग्णांमध्ये नगर शहरातील 25, नेवासा आणि संगमनेर येथील एक रुग्ण आढळून आला आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या 23 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत समाविष्ट करण्यात आली होती.