ETV Bharat / state

शिर्डी : कोरोना जैव वैद्यकीय कचऱ्यावर प्रशासनाचे लक्ष, नियमानुसार लावली जाते विल्हेवाट - शिर्डी कोरोना अपडेट

कोरोना रुग्णालयातील जैव वैद्यकीय घनकचरा अहमदनगर येथील मे.बायो क्लीन सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला पाठविला जात आहे.

शिर्डी कोरोना रुग्णालय
शिर्डी कोरोना रुग्णालय
author img

By

Published : Aug 7, 2020, 3:25 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या श्री साई आश्रम फेज 2 येथे सुरू करण्यात आलेले डेडीकेटेड कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर आणि विलगीकरण कक्ष येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय घनकचरा हा अतिसंसर्गजन्य असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार त्याची विल्हेवाट लावण्यासाठी अहमदनगर येथील मे.बायो क्लीन सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेला जैव वैद्यकीय घनकचरा पाठविला जात आहे.

श्री साईबाबा रुग्णालयामधील बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट विभागामार्फत त्याचे व्यवस्थापन करण्यात येत आहे.

सदरचे केंद्र दिनांक 4 जून 2020 पासून सुरू करण्यात आले असून तेथे निर्माण होणारा अतिसंसर्गजन्य जैव वैद्यकीय घनकचरा, ज्यामध्ये वापर झालेले पीपीई किट, हातमोजे, मास्क कॅप, फेस शिल्ड इत्यादी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार विल्हेवाट लावण्याकरिता स्वतंत्र वाहन व्यवस्था केलेली आहे.

अहमदनगर येथील मे.बायो क्लीन सिस्टीम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावत आहे. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांनी त्यासंबंधीचे काम या कंपनीस दिलेले असून आजतागायत सुमारे एक हजार कलर कोडेड येलो बॅग्स भरून जवळपास दोन टन इतका जैव वैद्यकीय घनकचरा शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अहमदनगर येथे पाठविण्यात आला आहे. यासाठीचा खर्च श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्याकडून करण्यात येत आहे.

परिसरात स्वच्छता राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, वैद्यकीय पथक, नगर पालिका कर्मचारी लक्ष ठेवत असून या कामाची वेळोवेळी पाहणी करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.