ETV Bharat / state

कोरोनातून वाचला.. पण 'या' कोरोना योद्ध्याने अपघातात गमावला जीव - cop died in accident in ahmednagar

मुंबई येथील पोलीस खात्यात रुजू असलेल्या पोलिसाने कोरोनावर मात केली होती. पण, गावी आल्यानंतर मित्रांसोबत फिरुन घरी परतताना त्या पोलिसाचा मृत्यू झाला.

madhav shirsat
माधव शिरसाठ
author img

By

Published : Jun 18, 2020, 7:02 AM IST

Updated : Jun 18, 2020, 7:12 AM IST

अहमदनगर - कोरोनातून बरा झालेल्या पोलीस कर्मचार्‍याचा अहमदनगरच्या राहुरीमधे झालेल्या चारचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला. माधव संपत शिरसाठ (वय 28 वर्षे) असे मृत पोलिसाचे नाव आहे.

अपघातग्रस्त वाहन
अपघातग्रस्त वाहन

मुंबईच्या सहारा पोलीस ठाण्यात ते नोकरी करत होते. तेथे कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाची लागण झाली होती. परंतु उपचारानंतर ते बरे झाले होते. या दरम्यान त्यांच्या सहकाऱ्यांकडून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर ते आपल्या मुळ गावी आले होते. मित्रांसमवेत मुळा धरण येथे फिरायला गेले होते. त्यानंतर घराकडे परतत असताना वांबोरी जवळ त्यांच्या चारचाकीचा अपघात झाला. यातच त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात पाच जण जखमी आहेत.

पोलिसांना कोरोनाची बाधा-

पोलीस खात्यात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात पोलीस मृतांचा आकडा 43 वर गेला आहे. राज्यातील विविध रुग्णालयात अजूनही कोरोनाबाधित 1 हजार 399 पोलिसांवर उपचार सुरू असून यात 204 पोलीस अधिकारी तर 1 हजार 195 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा - अहमदनगर; चीनच्या आगळीकीचा शिवसेनेकडून चिनी झेंडा जाळून निषेध...

Last Updated : Jun 18, 2020, 7:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.