ETV Bharat / state

कर्जबाजारी ठेकेदाराचे बेमुदत उपोषण; ३ वर्षांपासून रखडले कामाचे पैसे - Nagpur

महसूल विभागाच्या गौण खनिज विकास निधी योजनेअंतर्गत रस्ते आदी कामे पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत. या कामांचा निधी नागपूर कार्यालयाकडून जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे वर्गही झाला. परंतु, त्याची देयके अद्याप संबंधित ठेकेदारांना मिळत नसल्याने त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय अनास्थेमुळे कर्जबाजारी झाल्याचा आरोप ठेकेदार करत आहेत.

कर्जबाजारी ठेकेदाराचे बेमुदत उपोषण
author img

By

Published : Jun 2, 2019, 1:24 PM IST

अहमदनगर - महसूल विभागाच्या गौण खनिज विकास निधी योजनेअंतर्गत रस्ते आदी कामे पूर्ण होऊन तीन वर्षे झाली आहेत. या कामांचा निधी नागपूर कार्यालयाकडून जिल्हा खनिज प्रतिष्ठानकडे वर्गही झाला. परंतु, त्याची देयके अद्याप संबंधित ठेकेदारांना मिळत नसल्याने त्यांनी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय अनास्थेमुळे कर्जबाजारी झाल्याचा आरोप ठेकेदार करत आहेत.

कर्जबाजारी ठेकेदाराचे बेमुदत उपोषण

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मेसर्स टी. जी. तोरडमल अँड कंपनीच्यावतीने गौण खनिज विकासनिधी योजनेअंतर्गत रस्त्यांची तीन कामे सन २०१६ साली पूर्ण करण्यात आली होती. त्याची जवळपास ५६ लाखांची बिले नागपूर कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या बिलांच्या पूर्ततेसाठी नागपूर कार्यालयाकडे मागणी केली. त्यानंतर ही रक्कम अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संबंधित विभागाकडे जमा करण्यात आली. असे असले तरी काम करणाऱ्या ठेकेदारांना ३ वर्षे उलटली तरी ती देण्यात आलेली नाही.

या बिलांच्या मागणीसाठी ठेकेदार संघटना आणि पैसे अडकलेले ठेकेदार रमेश तोरडमल आंदोलन करत आहेत. जिल्हा खनिज प्रतिष्ठानमध्ये पालकमंत्री, ४ आमदार आणि जिल्हाधिकारी सदस्य आहेत. या सर्वांकडे पाठपुरावा करून ससेहोलपट झाल्याची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे कर्जबाजारी झाल्याची तक्रार तोरडमल यांनी केली आहे. तसेच प्रश्न मार्गी लागेपर्यंत बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Intro:अहमदनगर- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे लाखो रुपयांची देयके तीन वर्षे रखडण्याने ठेकेदाराचे बेमुदत उपोषण..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_contracter_protest_2019_vij1_7294297

अहमदनगर- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे लाखो रुपयांची देयके तीन वर्षे रखडण्याने ठेकेदाराचे बेमुदत उपोषण..

अहमदनगर- महसूल विभागाच्या गौण खनिज विकास निधी योजनेअंतर्गत रस्ते आदी कामे पूर्ण होऊन तीन वर्षे झालेली असली आणि या कामांचा निधी नागपूर कार्यालयाकडून जिल्हा खनिज प्रतिस्थान कडे वर्ग झाला असला तरी त्याची देयके संबंधित ठेकेदारांना मिळत नसल्याने संबंधित ठेकेदार आता मेटाकुटीला आलेली आहेत. संबंधित विविध विभागावाकडे पाठपुरावा करूनही लाखो रुपयांची देयके मिळत नसल्याने ठेकवदारांनी आता बेमुदत उपोषण आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय अनास्थे मुळे कर्जबाजारी झाल्याचा आरोप ठेकेदार करत आहेत.
जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात मेसर्स टी. जी.तोरडमल अँड कँपणीच्या वतीने गौण खनिज विकासनिधी योजनेअंतर्गत रस्त्यांची तीन कामे सण 2016 साली पूर्ण करण्यात आली होती. त्याची जवळपास 56 लाखांची बिले नागपूर कार्यालयाकडे पाठवण्यात आली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने ह्या बिलांच्या पूर्ततेसाठी नागपूर कार्यालयाकडे मागणी केल्या नंतर ही रक्कम अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संबंधित विभागाकडे जमा करण्यात आलेली असली तरी काम करणाऱ्या ठेकेदारांना तीन वर्षे उलटली तरी ती देण्यात आलेली नाही. या बिलांच्या मागणी साठी ठेकेदार संघटना आणि पैसे अडकलेले ठेकेदार रमेश तोरडमल आंदोलन करत आहेत. जिल्हा खनिज प्रतिस्थान मध्ये पालकमंत्री, चार आमदार आणि जिल्हाधिकारी सदस्य आहेत. या सर्वांकडे पाठपुरावा करून ससेहोलपट झाल्याची आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थे मुळे कर्जबाजारी झाल्याची तक्रार करत तोरडमल यांनी प्रश्न मार्गी लागे पर्यन्त बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनास्थेमुळे लाखो रुपयांची देयके तीन वर्षे रखडण्याने ठेकेदाराचे बेमुदत उपोषण..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.