राहता : लावणी स्टार गौतमी पाटील यांच्या आणखी एक कार्यक्रम प्रेक्षकांनी चांगलाच राडा घातला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे आयोजित कार्यक्रमात त्यामुळे गोंधळ उडाला. प्रेक्षकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार केला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. तसेच कार्यक्रमात चेंगराचेंगरी देखील झाली. यावेळी आयोजकांनी कार्यक्रमातुन गौतमीला पाटील यांना सुरक्षित बाहेर काढले.
तुफान राडा : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथे गुरुवारी रात्री गौतमी पाटील यांच्या नृत्याविष्काराला हजारो प्रेक्षकांनी हजेरी लावली. मात्र, गौतमीचा डान्स सुरू होताच काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैसे फेकण्यास सुरुवात केली. त्यामुळे गौतमीने नाराजी व्यक्त करत नृत्य थांबवले. स्वतः माईक घेऊन त्यांनी प्रेक्षकांना त्रास देऊ नये अशी विनंती केली. गौतमीने नृत्य थांबवताच प्रेक्षकांनी धिंगाना घालण्यास सुरवात केली. त्यामुळे कार्यक्रमस्थळी एकच गोंधळ उडाला.
आयोजकांची चांगलीच दमछाक : 60 बाऊन्सर्ससह, उन्मादी गर्दीवर नियंत्रण ठेवताना आयोजकांची चांगलीच दमछाक झाली. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोंधळ सुरूच राहिल्याने पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यावेळी प्रेक्षकांची गर्दी झाल्याने आयोजकांना कार्यक्रम संपवावा लागला. असे असतानाही गौतमी पाटील कारमध्ये बसत असताना काही प्रेक्षकांनी तिच्या कारला घेराव घातला. अखेर गौतमी पाटील बाऊन्सर आणि पोलिसांनी गराड्यात घटनास्थळावरून निघून गेल्या.
संगमनेरात गोधळ : संगमनेर तालुक्यातील तळेगाव येथे 11 फेब्रुवारी रोजी बिरोबा यात्रेनिमित्त जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांच्या हस्ते गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा डान्स सुरू होताच अनेक तरुणांनी बँरेकेट हटवण्याचा प्रयत्न केला. गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमासाठी 100 हून अधिक बाउन्सर, डझनभर महिला बाउन्सर, 30 ते 40 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवताना बाऊन्सरसह पोलिसांची दमछाक झाली. संगमनेर येथे आयोजित कार्यक्रमात तिने अनेक गाण्यांवर नृत्य केले. मात्र, या कार्यक्रमात तरुणांमुळे गोंधळ झाल्याने गौतमीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.
गौतमी पाटीलची चर्चा : हे सर्व होत असतानाच तिची गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. लावणी कलाकार गौतमी पाटील गेल्या वर्षभरापासून चर्चेचा विषय आहे. गौतमीच्या कार्यक्रमांची चर्चा झाली नाही असे कधी झाले नाही. सुरुवातीला फारशी चर्चेत नसलेल्या गौतमीने एका कार्यक्रमादरम्यान तिच्या अश्लील हावभावाबद्दल तिच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर ती अधिक प्रसिद्ध झाली. तिच्या प्रसिद्धीमुळे तिला डान्सच्या अधिक ऑफर्सही येऊ लागल्या. गौतमी पाटील तिच्या नृत्यशैलीमुळे वादात सापडली होती. ज्येष्ठ लावणी कलाकारांनी गौतमी पाटील यांच्यावर अश्लील हावभावांमुळे लावणीची बदनामी केल्याचा आरोप केला होता. या वादानंतर तिने माफी मागितली होती. पुन्हा असे प्रकार पुन्हा घडणार नसल्याचे तीने सांगितले होते.
हेही वाचा - Sharad Pawar News: पराभव दिसू लागला की, भाजपाकडून जातीयतेचा रंग- शरद पवारांचे मोठे विधान