ETV Bharat / state

MLA Vikhe Patil criticism on the Government : माजी विरोधी पक्षनेते आ. विखे पाटील यांचा महाविकास आघाडीवर घणाघात - Criticism of MLA Vikhe Patil

पुणतांबा ग्रामपंचायतीने केलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण ( Dedication of development works ) आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. ( Criticism of Vikhe Patil on Mahavikas Aghadi ) अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या कार्याची त्यांनी स्तुती केली.

Criticism of MLA Vikhe Patil
आमदार विखे पाटलांची टीका
author img

By

Published : May 21, 2022, 5:16 PM IST

नगर : बांधावर जाऊन ज्‍यांनी शेतकऱ्यांना मदतीची आश्‍वासनं दिली, त्‍यांनीच आज शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. सरकारचे धोरण फक्‍त बिल्‍डरधार्जीणे आहे. सरकार सत्‍तेतील आमदारांनाच निधी देत नाही, तर शेतकऱ्यांच्‍या योजनांना केव्‍हा देणार? असा प्रश्‍न उपस्थित करून, लसीकरणाचा वाचलेला पैसा मदत म्‍हणून शेतकऱ्यांना द्या, अशी मागणी राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे लोकार्पण : पुणतांबा ग्रामपंचायतीने विकसित केलेल्‍या विविध विकासकामांचे लोकार्पण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले. भास्‍करराव चव्‍हाण यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास सरपंच डॉ. धनंजय धनवटे, जिल्‍हा परिषद सदस्‍य शाम माळी, उपसरपंच महेश चव्‍हाण, पंचायत समिती सदस्‍या सुवर्णा तेलोरे, गणेश कारखान्‍याचे संचालक राजेंद्र थोरात, सुभाषराव कुलकर्णी, यशवंतराव चौधरी, शुक्‍लेश्‍वर वहाडणे, यांच्‍यासह ग्रामस्‍थ उपस्थित होते. या कार्यक्रमात पुणतांबा येथील असंख्‍य तरुण कार्यकर्त्‍यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या सर्वांचे आ. विखे पाटील यांनी सत्‍कार करून पक्षामध्‍ये स्‍वागत केले.

पंतप्रधान मोदींची स्तुती : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने जनतेच्‍या हिताचे निर्णय घेतल्‍यामुळे आत्‍मनिर्भरतेने देश पुन्‍हा उभारी घेऊन वाटचाल करीत असल्‍याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील यांनी सांगितले की, देशातील १८० कोटी लोकांचे लसीकरण मोफत पूर्ण करून, विश्‍वविक्रम करतानाच ८० कोटी लोकांना मोफत धान्‍य देऊन देशातील उपासमारी टाळली. २० लाख कोटी रुपयांचे आत्मनिर्भर पॅकेज जाहीर करून, समाजातील सर्वच घटकांना मदतीचा हात देण्‍याचे काम मोदीजींनी केल्‍यामुळेच ते आज विश्‍वनेता झाले असल्‍याचे ते म्‍हणाले.

आघाडीचे सरकार फसवून झाले : महाविकास आघाडी सरकार हे जनतेचा विश्‍वासघात करून, सत्‍तेवर आले आहे. कॉंग्रेस आणि शिवसेनेने सर्व तत्त्व गुंडाळली आहेत. राष्‍ट्रवादीला कोणतेही तत्त्वच राहिलेले नाही. केवळ सत्‍तेसाठी एकत्र आलेल्‍या या तीनही पक्षांना जनतेचे कोणतेही देणेघेणे राहिलेले नाही. अडीच वर्षांच्‍या कार्यकाळात हे सरकार राज्‍याच्‍या किंवा जनतेच्‍या हिताचा एकही निर्णय घेऊ शकलेले नाही, असा थेट आरोप करून, आ. विखे पाटील म्‍हणाले की, सरकार फक्‍त बिल्‍डरांना मदत करते, विदेशी दारूवरील कर माफ करते. मात्र, अडचणीत सापडलेल्‍या शेतक-यांना कोणतीही मदत करीत नाही.

शेतकऱ्यांना अनुदान नाही : आज राज्‍यात निधीअभावी कृषी योजना ठप्‍प झाल्‍या आहेत, कृषी विकासाचा कार्यक्रम पूर्णपणे थांबला आहे. नैसर्गिक आपत्‍तीमध्‍ये शेतक-यांना कोणतीही मदत सरकारकडून होत नाही. या पूर्वी बांधावर जाऊन मदतीच्‍या वल्‍गना करणारेच आता शेतक-यांना कवडीचीही मदत करायला तयार नाहीत. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजार रुपयांचे अनुदान देण्‍याच्‍या घोषणा आतापर्यंत तीनवेळा झाल्‍या पण हे सरकार शेतक-यांच्‍या खात्‍यात जमा करू शकलेले नाही.

औरंगजेबाच्या कबरी फुले वाहणाऱ्यांवर कारवाई कधी? : केंद्राने मोफत लस दिल्‍यामुळे राज्‍य सरकारचे ६ हजार कोटी रुपये वाचले आहेत. हा पैसा शेतक-यांना मदत म्‍हणून द्या अशी मागणी करून, आ. विखे पाटील म्‍हणाले की, जनतेचे लक्ष विचलित करण्‍यासाठीच वेगवेगळे मुद्दे महाविकास आघाडी सरकारकडून उपस्थित केले जात आहेत. औरंगजेबाच्‍या कबरीवर जाऊन फुले वाहणाऱ्यांविरुद्ध महाविकास आघाडी सरकार कोणतीही कारवाई करीत नाही हे दुर्दैव असल्‍याचे मत आ. विखे पाटील यांनी शेवटी व्‍यक्‍त केले.

हेही वाचा : Radhakrishna Vikhe Patil On CM : संवेदशील विषयाबाबत मुख्‍यमंत्री चुप्‍पी साधून - विखे पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.