शिर्डी - गरीबांचे मसीहा म्हणून प्रसिद्ध असलेले सिनेअभिनेते सोनू सूद ( Actor Sonu Sood ) यांनी आज साई समाधीचे दर्शन घेतले. त्यांना शिर्डीत ( Shirdi Sai Temple ) वृद्धाश्रम बांधायचे आहे. त्यासाठी ते शिर्डीत आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नवीन शिंदे सरकार'चे ( CM Eknath Shinde ) अभिनंदन त्यांनी शुभेच्छा देत दयपूरच्या घटने बाबत दु:ख व्यक्त केले आहे. उदयपूरची घटना अत्यंत दुर्दैवी ( Udaipur incident ) असल्याचे म्हटले आहे.
शिंदे सरकारला शुभेच्छा - अनेक दिवसापासून सुरु असलेल्या राजकिय घडामोडी नंतर आता राज्यात ठाकरे सरकार जावून शिंदे सरकार आले आहे. कालच एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यावेळी सोशल मिडियाच्या माध्यमातून बॉलीवुड कलाकरांनी देखिल शुभेच्छा दिल्या आहेत. आज सोनू सूदने देखिल एकनाथ शिंदे सरकारचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच बरोबरीने शिंदे सरकार कडून काही अपेक्षा ही व्यक्त केल्या आहेत. सोनू सूद ने यावेळी म्हटले की, महाराष्ट्रात स्थापन झालेल्या शिंदे सरकारचे मी अभिनंदन करतो. मुखमंत्र्यांनी राज्यात आता असे एक धोरण आणव ज्यांने सर्वसामान्य व्यक्तींचे जगण सुखकर होईल.
मानवतेच्या वर कोणताच धर्म नाही- उदयपूरमध्ये टेलर कन्हैय्यालालची झालेली हत्या ही अत्यंत दुखद आणि दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशात सध्या जे काही चालले आहे ते योग्य नाही. हिंदू, मुस्लीम हे सगळे बांधव आहेत. सर्वांनी एकत्र राहीले पाहीजे. मानवतेच्या वर कोणताही धर्म नाही. हा संदेश संपूर्ण देशात गेला पाहिजे. धर्माचा विचार न करता एकमेकांना मदत करणे अपेक्षित आहे असल्याचे ते म्हणाले.
कमी यशस्वी चित्रपट पृथ्वीराज - चित्रपट तयार करताना कलाकाराने प्रामाणिकपणे काम केले पाहीजे. पृथ्वीराज चित्रपट ज्यांनी पाहीला त्यांना तो खूप आवडला आहे. मात्र, चित्रपट चालणे किंवा न चालणे हे कलाकारांच्या हातात नसते. कलाकार जीव ओतून काम करत असतो. काही उणिवा राहिल्या असतील, तर त्या पुढचा चित्रपट तयार कराताना त्या उणीवांचा विचार करावयास हवा असे सोनू सूद पृथ्वीराज चित्रपटाला मिळालेल्या यशाबाबतच्या म्हटले आहे.
सोनू सूद शिर्डीत उभारणार वृद्धाश्रम - सोनू सूद यांना एका मोठ्या सामाजिक कार्याची सुरुवात करायची आहे. ज्याची सुरुवात ते शिर्डीतून करणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून वृद्धाश्रमसाठी जागा शोधणे सुरु आहे. त्याचा होमवर्क करण्यासाठी सोनू सूद शिर्डीत आले होते. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - Rape in Bihar : पोटच्या मुलीवर बाप-काकासह अनेकांचा अत्याचार, आरोपी वडीलांसह आईबरोबर काकालाही अटक