ETV Bharat / state

साईंच्या नावाने भक्तांची फसवणूक.. अन्नदानासाठी सोशल मीडियावर पैसे जमा करण्याची पोस्ट व्हायरल - साईमंदिर

शिर्डी साईबाबांना भाविक कोट्यवधी रुपयांचे दान करत असतात त्याचबरोबर शिर्डीत भिक्षा मागणाऱ्या गोरगरीब आणि गरजुवंत लोकाना गरजेच्या वस्तु आणि भोजन भाविक देत असतात. मात्र कोरोनामुळे सध्या साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याने भाविक शिर्डीत येत नाहीत. त्यामुळे आता काहींनी शिर्डीतील गोरगरीब जनतेला अन्नदान करण्यासाठी आर्थिक निधी उभारण्याचे काम सुरू केले आहे. सोशल मीडियावर हे आवाहन करत भक्तांच्या भावनेशी खेळण्याचा हा प्रकार आहे.

cheating-of-devotees-
cheating-of-devotees-
author img

By

Published : May 18, 2021, 4:42 PM IST

शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी साईबाबांना भाविक कोट्यवधी रुपयांचे दान करत असतात त्याचबरोबर शिर्डीत भिक्षा मागणाऱ्या गोरगरीब आणि गरजुवंत लोकाना गरजेच्या वस्तु आणि भोजन भाविक देत असतात. मात्र कोरोनामुळे सध्या साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याने भाविक शिर्डीत येत नाहीत. त्यामुळे आता काहींनी शिर्डीतील गोरगरीब जनतेला अन्नदान करण्यासाठी आर्थिक निधी उभारण्याचे काम सुरू केले आहे. त्यात शिर्डीतील श्री साईबाबा सेवाभावी संस्थान या नावाने सोशल मीडियावरुन अन्नदान करण्याचे आवाहन करत आहे. साईबाबा संस्थानच्या समरुप नाव असलेल्या अशा संस्थानशी साईबाबा संस्थानचा कोणताही सबंध नसल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी स्पष्ट केले आहे.

साईंच्या नावाने भक्तांची फसवणूक

४ एप्रिलपासून शिर्डीतील सर्व व्यवहारही बंद -

एरवी दररोज हजारो भाविक शिर्डीत येत असतात. त्यामुळे कोटींची उलाढाल होत असते. तसेच अनेक भिक्षेकरीही भक्तांकडून मिळणाऱ्या भिक्षा तसेच वस्तुंवर आपली गुजराण करत असतात. मात्र कोरोनाच्या प्रादुभावामुळे 4 एप्रिलपासून साईबाबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. तसेच शिर्डी साईबाबा संस्थानचे प्रसादालयही बंद केले आहे. त्यामुळे खरेच हातावर पोट असणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळे शिर्डीत काही लोकांनी उदार भावनेतून या गरजुंना अन्न पुरवठा सुरू करण्याचे काम केले जात आहे. त्यात आता काही संस्था़नीही सोशल मीडियावरुन साईभक्तांना दर गुरुवारी शिर्डीत आम्ही अन्नदान करु अनेकांना याची गरज आहे. त्यासाठी तुम्ही आमच्या खात्यात पैसे जमा करा, असे आवाहन सोशल मीडियावर केले आहे. या व्हायरल पोस्टद्वारे भाविकांच्या श्रद्धेशी खेळ केला जात असल्याचे बोलले जात आहे. त्यात आता साई संस्थानने पुढे येवुन शिर्डीतील श्री साईबाबा सेवाभावी संस्था शिर्डी या संस्थेचा आणि श्री साईबाबा संस्थान शिर्डी यांचा कोणताही सबंध नसल्याचे सांगत भक्तांना फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

साईंच्या नावाने भक्तांची फसवणूक -

शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अनेक संस्था आहेत. या संस्था नाव साधर्म्याचा फायदा घेवुन शिर्डीच्या साईबाबांना येणारी देणगी आपल्या संस्थाकडे वळत असल्याचे शिर्डीकरांचे म्हणणे आहे. याच बरोबरीने शिर्डीत अनेकांची उपासमार होतेय, असे साईभक्तांना दाखवून त्याच्याकडून पैसे जमा करण्याचे काम केले जात आहे. या संस्था खरंच किती लोकांना मदत करतात आणि किती पेसे मिळवतात याचे ऑडीट करण्याची गरज असून शिर्डीच्या आणि साईंच्या नावाने फसवणाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी शिर्डीकर करत आहेत.

शिर्डीत सहजा सहजी पैसा मिळत असल्याने अनेकांचे हे आश्रयस्थान झाले आहे. भक्ता़ची पाकीटमारी करणाऱ्या मोठ्या टोळ्याही तयार झाल्या आहेत. शिर्डीतील गुन्हेगारी वाढली गेली आता शिर्डीतील अर्थिक स्रोत थांबल्याने अन्नदानाची खोटी माहिती देवून जर कोणी फसवत असेल तर ते योग्य नाही जे चांगल्या हेतुने चांगले काम करताहेत त्यांच्या कामाचे कौतुकच व्हायला हवंय, मात्र भाविकांची फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.