शिर्डी - 'चला हवा येऊ द्या' या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शकर, सुत्रसंचालक डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या पत्नीसोबत साई बाबांच्या दरबारी हजेरी लावून नववर्षाची सुरुवात केली. वर्षभर काम करण्याची ताकद आणि हसविण्याची कला साईंमुळे मिळते, म्हणूनच साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.
साई बाबांच्या दर्शनानंतर निलेश साबळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. नव्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, 'माजी आणि आत्ताचे सरकार हे कलाकारांप्रती आस्था असणारे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'चला हवा येऊ द्या'ची क्लिप पाहिल्याशिवाय झोपत नव्हते. तर, विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हा कार्यक्रम आवर्जुन पाहतात.'
हेही वाचा -सारा अली खान भाऊ इब्राहिमसोबत घेतेय सुट्टीचा आनंद
'महाविकास आघाडी सरकार हा महाराष्ट्रात नवा प्रयोग आहे. राजकारणातील तीन शक्ती आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळं घडेल, अशी अपेक्षा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा -सतरा वर्षानंतर रितेशच्या 'त्या' गाण्याची शूटिंग अन ते ही बाभळगावात...