ETV Bharat / state

टाळेबंदीत साईबाबांच्या चावडी मंदिरात जाणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीत शिर्डीचे साई मंदिर दर्शनासाठी बंद आहे. असे असतानाही एका महिलेने मंदिरातील चावडीवर प्रवेश करत फोटो काढले. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. मंदिर बंद असतानाही तिने प्रवेश मिळवून दर्शने घेत साथ रोग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केले. यामुळे तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साई चावडीवर गेलेली शिवप्रिया
साई चावडीवर गेलेली शिवप्रिया
author img

By

Published : Jun 28, 2020, 7:11 AM IST

शिर्डी (अहमदनगर) - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून साई मंदिर तसेच परिसरातील सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. साईबाबा मंदिर आणि परिसरात कर्मचारी आणि अधिकारी वगळता इतरांना जाण्यास बंदी आहे. असे आसताना साईबाबांच्या चावडीत शिवप्रिया नामक महिलने प्रवेश केला. या प्रकरणी साईबाबा संस्थानने दिलेल्या तक्रारीवरुन साथ रोग प्रतिबंध कायद्यानुसार शिर्डी पोलीसांनी शिवप्रिया या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

टाळेबंदीमुळे साईबाबा मंदिर आणि परिसरातील व्दारकामाई चावडी, मारुती मंदिर अशा ठिकाणी भाविकांना आत प्रवेश करण्यास 17 मार्चपासून साई संस्थानच्या वतीने बंदी घालण्यात आली आहे. तसेच साईबाबा संस्थानने याठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात करत बॅरिकेटींग केले आहे. मात्र, गुरुवारी (दि. 25 जून) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शिवप्रिया नामक महिलेने साईबाबांच्या चावडीत प्रवेश मिळवला. आत जाऊन तिने चावडीतील साईंच्या फोटोजवळ 'फोटो सेशन' केले. एवढ्यावर न थांबता, वाढदिवसानिमित्त आपण टाळेबंदीमध्ये चावडीत जाऊन दर्शन घेतल्याचे सांगत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या ठिकाणचा सुरक्षा रक्षक दोन पाच मिनिटे बाहेर गेल्याने आपल्याला ही संधी मिळाली असल्याचे सांगत तिने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. त्यानंतर सर्व संस्थान यंत्रणा जागी झाली आहे.

शिवप्रिया हिने शिर्डीकरांच्या तसेच पंचक्रोशीतील भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे निवेदन शिर्डीतील ग्रामस्थांनी शनिवारी (दि. 27 जून) शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांना दिले आणि या महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच या महिलेविरोधात शनिवारी साई संस्थानच्या सुरक्षा रक्षकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी साथ रोग प्रतिबंध कायद्यानुसार या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

हेही वाचा - धक्कादायक; निसर्ग चक्रीवादळात खाली पडलेल्या विद्युत वाहक तारेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू, नागरिक संतप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.