अहमदनगर - यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असलेल्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील सूत्रधार वरिष्ठ पत्रकार बाळ बोठे याला अखेर पोलिसांनी हैदराबादमधून जेरबंद केले. शनिवारी सांयकाळी उशिरा त्याला थेट गुन्हा घडला त्या पारनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी त्याचे कुटुंबीय त्याला बिलगून रडले. त्याची उशिरापर्यंत वैद्यकीय चाचणी सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याला उद्या रविवारी सुट्टीच्या न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागण्यात येईल.
फॉर्च्युनरमध्ये आला आरोपी बोठे -
बोठे हा एक गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहे. मात्र, त्याला पारनेर पोलीस ठाण्यात एका महागड्या गाडीत आणण्यात आले, याबाबतही चर्चा होत आहे.
बदनामीच्या भीतीने बोठेने रचले हत्याकांड -
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, बोठेने रेखा जरे यांच्याकडून आपली बदनामी होऊ शकते. या शंकेने ही हत्या घडवून आणल्याची माहिती दिली. अजूनही इतर कारणे पोलीस तपासात स्पष्ट होतील, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - हैदराबाद पोलिसांना शरण येण्याचा बाळ बोठेचा बनाव
दाढी वाढवून वेषांतर करून राहत होता बाळ बोठे -
घटनेनंतर आरोपी म्हणून बोठेचे नाव स्पष्ट होताच तो फरार झाला. गेले साडेतीन महिने तो विविध ठिकाणी लपत असला तरी जास्त काळ तो हैदराबाद येथील बिलाल नगरमध्ये लपून होता. मात्र, चार दिवसांपूर्वी त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने चार ते पाच ठिकाणी स्थलांतर केले. अखेर हैदराबादमधील बालाजी नगर भागातील एका हॉटेलमध्ये त्याला आज (शनिवारी) सकाळी अटक करण्यात आली.
बोठे सह इतर चार आरोपींना अटक, एकाची चौकशी -
बोठेला मदत करणारा एक वकिलासह चार जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला हैदराबादमधून अटक; बदनामीच्या भीतीने हत्या - पोलीस अधीक्षक
वेषांतर करून राहत होता बाळ बोठे -
रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात आरोपी म्हणून बोठेचे नाव स्पष्ट होताच तो फरार झाला होता. गेले साडेतीन महिने तो विविध ठिकाणी वेषांतर करून राहत होता. सर्वात जास्त काळ तो हैद्राबाद येथील बिलालनगरमध्ये लपून होता. चार दिवसांपूर्वी त्याला पोलिसांचा सुगावा लागताच त्याने चार ते पाच ठिकाणी स्थलांतर केले. मात्र, शेवटी हैद्राबादमधील बालाजीनगर भागातील एका हॉटेलमध्ये त्याला आज (शनिवारी) सकाळी अटक करण्यात आली. बोठेला मदत करणाऱ्या एक वकीलासह चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आणखी एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
हत्येनंतर साडेतीन महिने बोठे होता फरार -
30 नोव्हेंबर रोजी रेखा जरे यांची पुण्याहून नगरला येताना जातेगाव घाटामध्ये गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पाच आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहे. या प्रकरणात बाळ बोठेचे नाव समोर आले होते. तेव्हापासून तो फरार होता. गेल्या साडेतीन महिन्यांपासून पोलीस त्याच्या मागावरती होती. केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक राज्यांमध्ये पोलिसांनी त्याचा शोध घेतला.